अटलांटिकच्या वर्तुळात दिसले 10 यूएफओ

अटलांटिकच्या वर्तुळात दिसले 10 यूएफओ
Published on
Updated on

वॉशिंग्टन : परग्रहवासी हे नेहमीच आपल्यासाठी उत्सुकतेचा विषय ठरले आहेत. या आधीदेखील एलियन्सबाबत अनेक दावे केले आहेत. वैज्ञानिक अद्भूत कथांवर बेतलेल्या चित्रपटांतूनही हे काल्पनिक एलियन्स अनेकदा झळकले आहेत. मात्र, उडत्या तबकड्या आणि त्यातील लोकांविषयी कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. आता परग्रहासंबंधी आणखी एक दावा समोर आला आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या अगदी खाली दहा छोट्या काळ्या गोष्टी उडत असताना टिपल्या गेल्या आहेत. त्यांना अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्टस् (यूएफओ) म्हटले जाते. अमेरिकन अंतराळ संस्था 'नासा'च्या लाईव्ह फीड दरम्यान, दक्षिण अटलांटिक महासागराच्या वर्तुळात हे 10 यूएफओ दिसले आहेत.

द सनच्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून 'नासा'च्या लाईव्ह स्ट्रीम दरम्यान घेतलेल्या छायाचित्रात ऑर्बसारखे ऑब्जेक्टस् दिसत आहेत. यूएफओ हंटर मिस्टर एमबीबी-333 ने स्पेस वॉचरचे घेतलेले स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. यामध्ये असे दिसत आहे की, काही लहान वस्तू विलक्षण वेगाने फिरत आहेत. या वस्तूंना यूएफओ म्हटले जात आहे. मात्र, 'नासा'ने अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन प्रसिद्ध केलेले नाही. सध्या हे फुटेज मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यूएफओ हंटरने म्हटले आहे की, पृथ्वीच्या वर असलेल्या अंतराळ स्थानकाजवळ कमीत कमी 10 अज्ञात वस्तू पाहिल्या गेल्या असून त्या यूएफओ असू शकतात. त्यामुळेच एलियन्सच्या अस्तित्वाविषयी नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

अमेरिकेमध्ये एलियन्स आणि यूएफओ संदर्भात सादर करण्यात आलेल्या अहवालात सरकारने म्हटले आहे की, नौदल वैमानिकांनी पाहिलेल्या रहस्यमय उड्डाण करणार्‍या वस्तूंचे स्वरूप निश्‍चित करण्यासाठी संरक्षण व गुप्‍तहेर विश्‍लेषकांकडे पुरेसा डेटा उपलब्ध नाही. मात्र, सरकारने यूएफओचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला नाही. अमेरिकन सरकारने प्रथमच कबूल केले की या विषयावरील सविस्तर संशोधनाची गरज आहे. विशेष म्हणजे अमेरिकेत आतापर्यंत यूएफओ पाहिल्याच्या 144 घटना नोंदवल्या गेल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news