जम्मू-श्रीनगर महामार्गावरील बोगदा कोसळला; ७ जण अडकले | पुढारी

जम्मू-श्रीनगर महामार्गावरील बोगदा कोसळला; ७ जण अडकले

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू – श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील रामबन जिल्ह्यातील खुनी नाला येथे चार लेन बोगद्याचे काम सुरू आहे. दरम्यान, बोगद्याचा काही भाग कोसळल्याने आतामध्ये ९ जण अडकले होते. त्यापैकी दोघा जणांना वाचविण्यात यश आले आहे. ही दुर्घटना गुरूवारी रात्री उशिरा घडली.

बोगद्याच्या प्रवेशाद्वारावरील कामाचे ऑडिट सुरू असताना ही दुर्घटना घडली. पोलिसांनी आणि भारतीय जवानांनी रात्री बचावकार्य सुरू करून दोघा जणांना सुखरूपपणे बाहेर काढले. कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली ऑडिट करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी अडकले आहेत. अद्यापही सात जण आतमध्ये अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button