माॅडेल मंदाना करीमीचा धक्कादायक खुलासा, म्‍हणाली, ” प्रेग्नेंट झाल्‍यानंतर…”

mandana karimi
mandana karimi
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

अभिनेत्री कंगना राणौतच्या 'लॉकअप'  शोमध्ये मॉडेल मंदाना करीमी हिने धक्कादायक खुलासा केला आहे. मंदाना आपल्‍या मनातील व्‍यथा  सांगण्‍यापूर्वीच रडू लागली. यानंतर तिने कंगनासमोर तिच्या आयुष्यातील धक्कादायक किस्सा शेअर केला.

एका दिग्‍गज दिग्दर्शकासोबत 'सिक्रेट रिलेशनशीप'

मंदानाने सांगितले की, लॉकडाऊनमध्ये ती काही काळ जगापासून पूर्णपणे दूर गेली होती. तिचा पुरुषांवरचा विश्वास उडाला होता. ती एका दिग्गज चित्रपट दिग्दर्शकासोबत सिक्रेट रिलेशनशीपमध्ये हाेती.जो नेहमी महिलांच्या हक्कांबद्दल आणि त्यांच्या आत्मनिर्भरतेबद्दल बोलत होता. हे नाते जवळपास दीड वर्ष टिकले. लिव्ह इनमध्ये राहताना दोघांनी प्रेग्नेंसी प्लॅन करण्याचा निर्णय घेतला. पण जेव्हा मंदाना प्रेग्नेंट राहिली तेव्हा हा व्यक्ती मागे हटला.

हा दिग्दर्शक आजही तरुणांसाठी आयडॉल असून, त्याला आई-वडील नसल्याचे मंदनाने सांगितले. दोघांच्या संमतीने प्रेग्नेंसीचे नियोजन करण्यात आले होते; पण वडील होण्यासाठी भावनिकदृष्ट्या तयार नसल्याचे त्याने मंदानाला सांगितले. या दिग्दर्शकाने सांगितले की, त्याला आधीच एक मूल आहे. तो म्हणाला की,  वयाच्या ३३ व्या वर्षीही तू इतक्या सहज गरोदर राहशील, असे मला वाटले नाही. यानंतर मंदाना एका कॉमन फ्रेंडकडे गेली आणि तिथे गर्भपाताचा निर्णय घेतल्‍याचे तिने सांगितले.

मंदाना म्हणाली, 'जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा तो माझ्या मित्राला म्‍हणाला की, तो पिता हाेण्‍यास तयार नाही. त्याने सर्व गोष्टींचे नियोजन केले आणि माझ्या मित्रालाही गर्भपातासाठी पटवून दिले. मी माझ्या मित्राची माफी मागितली आणि माझ्या घरी परत आले. मंदनाने सांगितले की, वाटेत त्याने तिला सतत गर्भपातासाठी समजवण्याचा प्रयत्न केला यानंतर तिने गर्भपात करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news