माेठा दिलासा : देशभरात कोरोनाबाधितांची संख्येत माेठी घट | पुढारी

माेठा दिलासा : देशभरात कोरोनाबाधितांची संख्येत माेठी घट

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या कमालीची घट झाली आहे. सोमवारी दिवसभरात केवळ ७९५ कोरोनाबाधितांची भर पडली.  सुमारे दोन वर्षांनी गेल्या दोन दिवसांपासून देशभरात एक हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद घेण्यात आली आहे, हे विशेष.५८ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. १ हजार २८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  मंगळवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७६ टक्के तर, दैनंदिन कोरोना  संसर्गदर ०.१७ टक्के नोंदवण्यात आला.

देशातील एकूण ४ कोटी २४ लाख ९६ हजार ३६९ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. तर, १२ हजार ५४ सक्रीय रुग्णांवर (०.०३ टक्के) उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५ लाख २१ हजार ४१६ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १८४ कोटी ८७ लाख ३३ हजार ८१ डोस देण्यात आले आहेत. खबरदारी म्हणून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स तसेच ६० वर्षांहून अधिक वयोगटातील नागरिकांना २ कोटी ३६ लाख १५ हजार ३८१ बूस्टर डोस देण्यात आले आहेत. त१२ ते १४ वयोगटातील बालकांना आतापर्यंत १.९२ कोटी डोस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १८५ कोटी ५३ लाख ४४ हजार ४९५ कोरोना लशींपैकी १५ कोटी ७० लाख ७९ हजार ६ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ७९ कोटी १५ लाख ४६ हजार ३८ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ४ लाख ६६ हजार ३३२ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत,अशी माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

देशातील बूस्टर डोसची स्थिती
श्रेणी बूस्टर डोस
१) आरोग्य कर्मचारी ४४,९०,९४१
२) फ्रंटलाईन वर्कर्स ६९,२९,२०१
३) ६० वर्षांहून अधिक ११,५६,८९,४१७

हेही वाचलंत का ? 

Back to top button