Grammy  Award 2022 : ग्रॅमी पुरस्कार विजेत्‍या फाल्‍गुनीने मुंबईतून केली हाेती करियरला सुरुवात

Grammy  Award 2022 : ग्रॅमी पुरस्कार विजेत्‍या फाल्‍गुनीने मुंबईतून केली हाेती करियरला सुरुवात
Published on
Updated on
पुढारी; ऑनलाईन डेस्क :
संगीत क्षेत्रातील सर्वात प्रतिष्‍ठेचा मानला जाणारा पुरस्कार म्हणून ग्रॅमी पुरस्कारची जगभरात ओळख आहे. साेमवारी ( दि.४)  ६४ वा ग्रॅमी पुरस्कार (Grammy  Award 2022) वितरण सोहळालास अमेरिकेत पार पडला. भारतीय-अमेरिकन असलेल्या फाल्गुनी शाहने  (Falguni Shah) ग्रॅमी  पुरस्कारावर आपली मोहर  उठवली आहे. तिला  'अ कलरफुल वर्ल्ड' या बेस्ट चिल्ड्रेन म्युझिक अल्बम साठी गौरविण्यात आले आहे. 

Grammy  Award 2022 : "फालु' 

फाल्गुनी शाह हिला संगीत क्षेत्रातात "फालु' या नावाने ओलखली जाते.  फाल्गुनीने आपल्या पुरस्काराची बातमी आपल्या सोशल मीडियावर शेअर करत  म्हंटले आहे की, "आज माझ्याकडे भावना व्यक्‍त करण्यासाठी शब्दच नाहीत. ग्रॅमी पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे" तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कॉमेंंटचा वर्षाव केला आहे.६४ व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात जगभरातील दिग्गज संगीतकार, गायकांनी हजेरी लावली होती. ए. आर. रेहमान यांनीही या पुरस्काराला सोहळ्याला हजेरी लावली होती. 

Grammy  Award 2022 मुंबईमधुन झाली करियरला सुरुवात

फाल्गुनी काही वर्षे मुंबईमध्ये राहीली. तिथुनच तिने आपल्या करियरला सुरुवात केली. सुरुवातीला तिला जयपुर संगीत परंपरेत कौमुदी मुंशी यांचे मार्गदर्शन लाभले. नंतर तिने प्रसिध्द गायक/सारंगी वादक असलेले उस्ताद सुल्तान खान यांच्याकडे गाण्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर ती २००० मध्ये बोस्टन बेस्ड इंडो अमेरिकन बॅंड कर्श्मा मध्ये सामिल झाली. तिथे ती प्रमुख गायक होती. नंतर तिने बोस्टन मध्ये टफ्सस विद्यापीठात दोन वर्षे भारतीय संगीताचा अभ्यास केला. यानंतर ती न्यूयॉर्कला गेली आणि तिथे आपला बॅंड सुरु केला.

२०१९ मध्ये ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन

 २००९ साली तिला व्हाईट हाउसमध्ये संगीत दिग्दर्शक  ए. आर. रेहमान यांच्यासोबत गाण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. त्यानंतर तिने २०१८ मध्ये हिंदी, इंग्रजी आणि गुजरातीमध्ये मुलांसाठी १२ गाण्यांचा अल्बम आणला. २०१९ मध्ये या अल्बमला २०१९ मध्ये लहान मुलांचा सर्वश्रेष्ठ श्रेणी- ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालेले; पण तिला हा पुरस्कार मिळवता आला नाही. नंतर तिने २०२१ मध्ये 'अ ब्युटीफुल वर्ल्ड' हा नवा अल्बम आणला आणि २०२२ मध्ये तिला ग्रॅमी पुरस्कारने (Grammy  Award 2022)गौरविण्यात आले. 

भारतीय आणि पाश्चात्य संगीत मिश्रणासाठी ओळखली जाते

फाल्‍गुनी शाह ही भारतीय आणि पाश्चात्य संगीत मिश्रणासाठी ओळखली जाते. तिने 'स्मॅमडॉग मिलियनेयर' या चित्रपटासाठी  ए. आर. रेहमान, 'द सिल्क रोड प्रोजेक्ट' साठी यो-यो मा त्याचबरोबर तिने फिलिप ग्लास आणि वाईक्लिफ या कलाकारंसोबत काम केले आहे.
हेही वाचलतं का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Falumusic (@falumusic)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news