पाकिस्तानमधील जनतेने निवडणुकीची तयारी करावी : इम्रान खान | पुढारी

पाकिस्तानमधील जनतेने निवडणुकीची तयारी करावी : इम्रान खान

पुढारी ऑनलाईन डेस्क : माझ्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यामागे परकीय षड्यंत्र आहे. परकीय शक्तींनी विरोधकांना पैसे पुरवले, मात्र आम्‍ही त्यांचा हा डाव उधळला आहे, असे सांगून पाकिस्तानी जनतेने मध्यावधी निवडणुकीसाठी सज्ज रहावे, असे आवाहन पंतप्रधान इम्रान खान यांनी आज (रविवार) केले. अविश्वास ठराव सभापतींनी फेटाळून लावल्यानंतर इम्रान खान यांनी जनतेला संबोधित करताना आपली भूमिका स्पष्ट केली.

 

इम्रान खान  (Imran Khan) यांच्याविरोधातील अविश्वास ठराव हा घटनाबाह्य असल्‍याचे स्‍पष्‍ट करत पाकिस्‍तान संसदेच्‍या सभापतींनी तो फेटाळून लावला. त्यामुळे इम्रान खान यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तूर्तास त्यांना जीवदान मिळाले असून, त्यांचे पंतप्रधान पद शाबूत राहिले आहे.  संसद बरखास्त करण्याची मागणी करत इम्रान खान यांनी मध्यावधी निवडणुकीसाठी जनतेला सज्ज राहावे, असे आवाहन केले.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविराेधातील अविश्वास ठरावावर आज (रविवार) मतदान होणार  होते; परंतु पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठराव हा घटनाबाह्य असल्‍याचे स्‍पष्‍ट करत पाकिस्‍तान संसदेच्‍या सभापतींनी तो फेटाळला. यानंतर पाकिस्‍तान संसदेचे कामकाज २५ एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button