पायल रोहतगीने मर्यादा सोडल्या, म्हणाली पुनम पांडे एक तर कपडे काढून टाकेल किंवा…!

पायल रोहतगीने मर्यादा सोडल्या, म्हणाली पुनम पांडे एक तर कपडे काढून टाकेल किंवा…!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :'लॉकअप' शोमधील स्पर्धक पायल रोहतगी आणि पूनम पांडे यांच्यात चांगलीच जुंपली. कंगना राणौतने होस्ट केलेल्या 'लॉकअप' शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये स्पर्धक पायल रोहतगी आणि पूनम पांडे यांच्यात मांजरणी सारखी झुंज पाहायला मिळाली. या शोमध्ये दाखवण्यात आलेल्या सर्वात वाईट लढतींपैकी एक पायल आणि पूनमची लढत होती. इस्लामोफोबिक कमेंटवरून संपूर्ण घर झीशान खानच्या विरोधात गेल्याचे दिसले. कर्नाटकात हलाल मांसावर बंदी घालण्याची कशा प्रकारे मागणी होत आहे, अशी बातमी लॉकअपमध्ये दाखविल्यानंतर हा वाद सुरू झाला.

झीशानवरील वक्तव्याने वाद सुरु

कर्नाटकात हलाल मांसावर बंदी घातलेल्या झीशान खान आणि पायल रोहतगी यांच्यातील चर्चेचे हळूहळू वादात रूपांतर झाले. मात्र, भांडणाचे हे कारण नव्हते. पायलच्या टीम मेंबरने तिला टास्कमध्ये कमावलेल्या नाण्यांबद्दल विचारले तेव्हा ती आणखी चिडली आणि परिस्थिती आणखी बिघडली. कारण टीम मेंबरपैकी कोणीही पायलशी नीट बोलत नव्हते आणि तिच्याशी चांगले वागतही नव्हते,म्हणून पायलने ते नाणे जेलरला परत केले .

पायल आणि पूनममध्ये असे बिघडले ?

निशा, मंदाना आणि झीशान यांनी कोणीच पायलकला काहीच उत्तर न मिळाल्याने तिने त्यांना टोमणे मारण्यास आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. परिस्थिती आणखी बिघडली आणि पायलने झीशानविरुद्ध इस्लामोफोबिक कमेंट्स केल्या. पायलने झीशानला दहशतवादी म्हटले. ही गोष्ट कोणालाच आवडली नाही आणि सगळे पायलच्या विरोधात गेले. या गोष्टीने सर्वाधिक प्रभावित झालेल्या झीशाननेही पायलला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

अशी झाली पायल आणि पूनमची टक्कर

या सगळ्यात पूनम पांडेनेही पायलला शिवीगाळ करत तीने मर्यादा ओलांडल्याचे सांगितले. पायल पूनमवर पुन्हा भडकून , तिला काही दिवसांपूर्वी निशाबद्दल केलेल्या ब्राह्मण टिप्पणीची आठवण करून देते. भांडण आता पूनम आणि पायलमध्ये जुंपले आणि पूनमने पायलला शिवीगाळ केली. यावर पायलनेही तिच्याच शैलीत उत्तर 'दे दे गंदी गालियां दे… दो ही चीजें आती हैं तुझे… या तो मां बहन की गालियां देगी या फिर कपड़े निकालेगी।' असभ्य टीका केली.

…तुम्हाला फक्त दोनच गोष्टी माहित आहेत : पायल रोहतगी

पायल रोहतगी म्हणाली, 'दे दे गंदी गालियां दे… दो ही चीजें आती हैं तुझे… या तो मां बहन की गालियां देगी या फिर कपड़े निकालेगी।' असे म्हणत यावरही पूनमने पायलला शिवीगाळ करणे थांबवले नाही आणि मग पायलने तिचा मुद्दा पुन्हा सांगितला.'या तो नंगी होती है या तो मां बहन की गालियां देती है। यही आता ही है तुझे।' यानंतरने मात्र कंगना राणौतने मध्यस्थी करत पायल रोहतगीला घेरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news