इम्रान खान यांच्‍या भवितव्‍याचा आज फैसला | पुढारी

इम्रान खान यांच्‍या भवितव्‍याचा आज फैसला

पुढारी ऑनलाईन डेस्‍क ; पाकिस्‍तानचे पंतप्रधान इम्रान खान पदावरुन पायउतार होणारी की, विरोधी पक्षांना भारी पडत विश्‍वासदर्शक ठराव जिंकणार याचा फैसला आज चार वाजता होणार आहे. पाकिस्‍तानच्‍या संसदेत चार वाजता इम्रान खान यांच्‍याविरोधात अविश्‍वास ठराव मांडला जाईल. पाकिस्‍तानमधील सरकार अल्‍पमतात आले आहे. यामुळेच इम्रान खान यांनी रविवारी भव्‍य रॅली काढून विरोधी पक्षांच्‍या नेत्‍यांवर हल्‍लाबोल केला, असा दावा पाकिस्‍तानच्‍या माध्‍यमातून केला जात आहे.

इम्रान खान यांच्‍या मंत्रीमंडळातील ५० मंत्री होते ‘नॉटरिचेबल’

पाकिस्‍तानमधील इम्रान खान यांच्‍या तहरीक-ए-इन्‍साफ ( पीटीआय) पक्षाच्‍या ५० मंत्री नॉटरिचेबल होते. मागील काही दिवस हे मंत्री पक्षाचाही संपर्कात नाहीत, असा दावा पाकिस्‍तानमधील माध्‍यमांकडून केला जात होता. आज इस्‍लामाबादमध्‍ये विरोधी पक्षांची आघाडी एक सभा घेणार आहे. यामध्‍ये जमिय ए इस्‍लाम फज्‍ल आणि पाकिस्‍तान मुस्‍लिम लीग -नवाज या पक्षाचे नेतेही सहभागी होणार असल्‍याचे जाहीर केले आहे. विरोधी पक्षाचे शक्‍तीप्रदर्शन हे संसदेचे कामकाज सुरु झाल्‍यानंतर होईल. एकीकडे इम्रान खान यांच्‍यावर अविश्‍वास ठराव दाखल केला जाईल. तर दुसरीकडे रस्‍त्‍यावर उतरुन त्‍यांच्‍याविरोध केला जाईल, असे विरोधी पक्षांच्‍या नेत्‍यांनी म्‍हटलं आहे.

विरोधी पक्षांच्‍याकडे १६३ तर इम्रान यांना १५५ सदस्‍यांचे समर्थन

पाकिस्‍तानमधील माध्‍यमांनी दिलेल्‍या वृत्तांनुसार, कॅबिनेट मंत्री शाहजहान बुगती यांनी राजीनामा दिला आहे.
बलुचिस्‍तानच्‍या चमुरी वतन पक्षाचे नेते असणारे बगुती हे इम्रान खानच्‍या सरकारमध्‍ये मंत्री होते. विरोधी पक्षांकडे १६३ तर इम्रान यांना १५५ सदस्‍यांचे समर्थन आहे. बलुचिस्‍तान आवामी पार्टी आणि मुत्ताहिदा कौमी मुव्‍हमेंट पाकिस्‍तान या पक्षांनी अद्‍याप निर्णय घेतलेला नाही.

पाकिस्‍तान नॅशनल ॲसेब्‍लीमध्‍ये एकुण ३४२ सदस्‍य आहेत. बहुमतासाठी १७२ सदस्‍य आवश्‍यक आहेत. इम्रान खान यांच्‍या नेतृत्‍वाखलील सकारला १७९ सदस्‍यांचे समर्थन होते. यामध्‍ये मुत्ताहिदी कौमी मुव्‍हमेंट पाकिस्‍तान, पीएमएल, बलुचिस्‍तान अवामी पार्टी आणि ग्रँड डेमोक्रेटिक अलायन्‍स या पक्षांचे इम्रान खान यांना समर्थन होते.

पाकिस्‍तानमधील पंजाब प्रातांच्‍या मुख्‍यमंत्रीविरुद्‍ध अविश्‍वास प्रस्‍ताव

पाकिस्‍तानमधील पंजाब प्रातांचे मुख्‍यमंत्री उस्‍मान बुजदार यांच्‍याविरोधात अविश्‍वास प्रस्‍ताव मांडला आहे. यामुळे इम्रान खान यांच्‍या अडचणीत भर पडली आहे. त्‍यांच्‍या पक्षावर बुजदार यांना हटविण्‍यासाठी दबाव वाढला आहे, असे पाकिस्‍तानमधील वृत्तवाहिनी जियोने म्‍हटलं आहे. तसेच बुजदार यांच्‍या शिफारसीवरुन इम्रान खान हे पंजाब विधानसभेचा भंग करुन राज्‍यात पुन्‍हा निवडणुका घेण्‍याचा निर्णय घेवू शकतात, अशीही शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे.

हेही वाचलं का?

 

Back to top button