पुतीन यांना पहिला तगडा हादरा; युक्रेनचा युरोपियन महासंघात समावेश | पुढारी

पुतीन यांना पहिला तगडा हादरा; युक्रेनचा युरोपियन महासंघात समावेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेन आता युरोपियन संघाच्या सदस्यपदी घेण्यात आला आहे. कारण, युक्रेनचा सदस्यपदाचा अर्ज युरोपियन संघाने स्वीकरला आहे. आता फक्त औपचारिक घोषणा होणं बाकी आहे. त्याचबरोबर रशियाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतून बाहेर काढा, अशी मागणी ब्रिटनने केलेली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील ही सर्वात महत्वाची घटना आहे, असं मानलं जात आहे.

युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की हे नुकतेच एका व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे युरोपियन संसेदेच्या चर्चेत सहभागी झाले होते. यावेळी भाषणाने सर्वच संसदेतील मंडळी अगदी भारावून गेले आणि काही मिनिटं त्यांच्यासाठी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट सुरु केला. रशियाने हल्ला केल्यानंतर युक्रेनमधील अनेक शहरं उद्ध्वस्त होत आहेत. अशामध्ये नागरिकांचा आत्मविश्वास वाढवून आपण लढा कायम ठेवणार असं झेलेन्स्की म्हणाले.

“आमचा लढा आमच्या जमिनीसाठी, स्वातंत्र्यासाठी आहे. आमची सर्व शहरं घेरली असली तरी आम्हाला कोणीच तोडू शकत नाही. आम्ही ताकदवर आहोत, आम्ही युक्रेनियन आहोत”, असं मत झेलेन्स्की यांनी मत व्यक्त करताच युरोपियन संसदेनं उभं राहून टाळ्या वाजवत त्यांचं कौतुक केलं.

झेलेन्स्की पुढे म्हणाले, ”रशिया हा दहशतवादी देश आहे. रशियाचा हल्ला म्हणजे हा दहशतवादच आहे. रशियाच्या हल्ल्यात काल युक्रेनमधील १६ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. आमचे नागरिक या हल्ल्याची किंमत चुकवत आहेत. पण आमचा लढा स्वातंत्र्यासाठी असून आम्हाला इतर देशांचा पाठिंबा मिळत आहे. पण रशियाची ही वागणूक ना कोणी माफ करणार, ना कोणीही विसरेल.”

Back to top button