कीव्ह : पुढारी ऑनलाईन डेस्क
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या आवाहनाला युक्रेनमधील अनेक नागरिकांनी प्रतिसाद देत थेट युद्धभुमीत पाय ठेवला आहे. यामध्ये सामान्य नागरिकांसह तेथील खेळाडू, खासदार युध्दात सामील झाले आहेत. (Ukraine vs Russia)
यामध्येयुक्रेन ब्युटी क्वीन आणि मिस युक्रेन विजेती मॉडेल अनास्टासिया लेना देखील राष्ट्रध्यंक्षाच्या आवाहनाल प्रतिसाद देत सैन्यात भरती झाली आहे. सैन्यात भरती झाल्याचा फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्यासह युक्रेनमधील अनेक नागरिकांनी देखील मातृभूमीचे संरक्षण करण्यासाठी हातात शस्त्रे घेतली आहेत.
युद्धाची सुरुवात होण्याच्या आधीपासूनच अनास्टासियाने इन्स्टाग्रावर देशभक्तीचे संदेश देणाऱ्या विविध पोस्ट सोशल मीडियावरती शेअर केल्या होत्या. आता तिने लष्करी पोशाखातील फोटो शेअर केला. यावेळी तिच्या हातात बंदूकही आहे. युक्रेनची मिस ब्युटी क्वीन व मिस युक्रेन पुरस्कार पटकवणारी मॉडेल अनास्टिया लेनाने २०१५ला मिस ग्रँड इंटरनॅशनल सौंदर्य स्पर्धेत सहभाग घेतला होता.
सोशल मीडियावर फोटो शेअर करत ती म्हणते की, "आमचा भूभाग बळकावण्याच्या हेतूने जो कुणी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करेल, तो मारला जाईल." यावेळी तिने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलनेस्की यांची स्तुती केली आहे. त्यांची स्तुती करताना म्हणते झेलनेस्की हे सच्चे आणि कणखर नेते आहेत. असा उल्लेख तिने केला आहे. त्यासोबत तिने युध्दासाठी युक्रेनला आर्थिक मदत करण्याची भावनिक आवाहन केले आहेत.(Ukraine vs Russia)