#GoaElections2022 Live : गोव्यात ३ पर्यंत ६०.१८ टक्के मतदान | पुढारी

#GoaElections2022 Live : गोव्यात ३ पर्यंत ६०.१८ टक्के मतदान

पणजी; पुढारी वृत्‍तसेवा 

गोव्यात विधानसभेसाठी मतदान (#GoaElections2022) सुरू आहे. गोव्यात दुपारी ३ पर्यंत ६०.१८ टक्के मतदान झाले आहे. उत्तर गोव्यात ६०.६८ टक्के तर दक्षिण गोव्यात ६०.८७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. आता उमेदवारांना होणार्‍या मतदानाच्या टक्केवारीची उत्सुकता लागून राहिली आहे. आज 301 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद होणार आहे. (Goa Election 2022) गेल्या महिनाभरात प्रत्येक उमेदवाराने मतदारांना आकर्षित करण्याचे सर्वप्रकारे प्रयत्न केले. आता मतदारराजा कोणावर प्रसन्न होणार, हे आपल्याला 10 मार्चच्या निकालादिवशीच समजून येईल.

पहा लाइव्ह अपडेट्स…

गोव्यात ३ पर्यंत ६०.१८ टक्के मतदान, उत्तर गोव्यात दुपारी ३ पर्यंत ६०.६८ टक्के तर दक्षिण गोव्यात ६०.८७ टक्के मतदानाची नोंद

गोव्यात विधानसभेसाठी आज मतदान सुरू आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत ४४.६२ टक्के मतदान झाले आहे. 

दुपारी 1 वाजेपर्यंत 44.53 टक्‍के मतदान झाले आहे.

दिव्यांग हक्क संघटनेचे अध्यक्ष अवेलिनो डिसा यांनी गृह विज्ञान महाविदयालय पणजी येथे मतदान केले

गोव्यात अकरा वाजेपर्यंत २६.६३ टक्के मतदान

सांगेच्या तारीपंटो मतदानकेंद्रावर सकाळी अकरा वाजेपर्यंत पन्नास टक्के विक्रमी मतदान

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर विजमंत्री आणि कुडचडेचे भाजप उमेदवार निलेश काब्राल

कळंगुट : पर्र येथे केंद्रावर मतदान केल्यानंतर कळंगुट काँग्रेस उमेदवार मायकल लोबो व शिवोली काँग्रेस उमेदवार डिलायला लोबो

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी बायणा ( वास्को ) येथे आपला मतदानाचा हक्क बजावला

गोवा विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या सांगे मतदारसंघातील उमेदवार राखी नाईक प्रभुदेसाई यांनी नेत्रावळी या ग्रामीण भागात मतदान केले.

पर्वरीचे भाजप उमेदवार रोहन खंवटे यांनी मतदानाचा अधिकार बजावला

गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई आणि त्या पत्नी के. रीटा मतदान केल्याची खूण दाखवताना. ताळगाव विधानसभा मतदारसंघात दोनापावल येथे त्यांनी मतदान केले.

मगोचे मडकई मतदारसंघातील उमेदवार सुदिन ढवळीकर कुटुंबियांसह मतदान केल्यानंतर विजयाची खूण करताना.

– अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर यांनी पणजीतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला 

 

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनी श्री रुद्रेश्वराचे दर्शन घेतले

भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी तानावडेवाडा पीर्ण (ता. बार्देश) येथे विधानसभा निवडणुकीत मतदान केले. 

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभा निवडणुकीत कोठंबी पाळी येथील मतदान केंद्रांवर मतदान केले.

तृणमूल‌ कॉंग्रेसचे सांतआंद्रे मतदारसंघातील उमेदवार जगदीश भोबे कुटुंबियांसह मतदान‌ केल्याची निशाणी दाखवताना. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी‌ सकाळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निवडणुकीत यश‌ मिळण्यासाठी दूरध्वनीवर शुभेच्छा दिल्या

 

मतदानासाठी मुख्यमंत्र्यांसह मतदारांचा उत्साह…

 

  • मतदानाच्या दिवशी सावर्डेचे भाजपचे उमेदवार गणेश गावकर आणि अपक्ष दिपक पाऊसकर हे परस्परविरोधी उमेदवार एकमेकांसमोर आले आणि काही वेळ त्यांच्यात मतदानाबद्धल चर्चा झाली.

 

  • भाजपकडून माजी मंत्री दिपक पाउसकर यांना डावलून गणेश गावकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे पाऊसकर यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. प्रचारा दरम्यान त्यांच्यात आरोप प्रत्यारोपांचे सत्र ही सुरू होते. मतदानाच्या दरम्यान दोघेही एकमेकांच्या समोर आले. त्यांनी एकमेकांशी हस्तालोंदनही केले.काही काळ त्यांच्यात मतदानाबद्धल चर्चा झाली.

Back to top button