‘पेगासस’ ने केली १० पंतप्रधान आणि एका राजाची हेरगिरी

फाईल फोटो
फाईल फोटो

पुढारी ऑनलाईन डेस्क: देशात 'पेगासस' च्या हेरगिरीवरून भाजपला घेरले जात आहे. 'पेगासस' ने जगभरातील ५० हजार फोन नंबरर्सची हेरगिरी केली असून, त्यात १० पंतप्रधान आणि एका राजाचा समावेश आहे.

अधिक वाचा 

पेगाससने देशातील विरोधी पक्षातील नेते, केंद्रीय मंत्री, पत्रकार आणि अन्य व्यक्तींचे फोन हॅक करून माहिती चोरल्याचा मुद्दा समोर आला आहे. पेगाससने केवळ भारतातील नव्हे तर जगभरातील विविध देशांतील नेत्यांचे फोन हॅक केले आहेत.

यात ५० हजार फोन नंबर्सचा समावेश असून विविध १० देशांतील पंतप्रधान आणि एका राजाचा समावेश आहे.

अधिक वाचा:

या प्रकरणावरून 'एमनेस्टी'चे महासचिव ऐग्नेस कालामार्ड म्हणाले की, या अभूतपूर्व खुलाशांमुळे जगभरातील नेत्यांना धडकी भरले पाहिजे.'

अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्ट या वर्तमानपत्राने लिहिले आहे, एमेनेस्टी आणि फ्रान्समधील फॉरबीडन स्टोरीजना मिळालेल्या ५० हजार फोन नंबर्समध्ये दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा आणि इराकचे राष्ट्रपती बहरम सलिह यांचाही समावेश आहे.

अधिक वाचा

हेरगिरी प्रकरणात मोरकोचे राजा मोहम्मद व्हीआय, पंतप्रधान साद एद्दीन एल ओथमानी, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, कोरियाचे पंतप्रधान मदबूली यांचा समावेश आहे. वॉशिंगटन पोस्टने हेही लिहिले आहे की, कुठल्याही राष्ट्राध्यक्षाने आपला फोन तपासणीसाठी दिलेला नाही.

त्यामुळे पेगाससच्या हेरगिरी करणाऱ्या सॉफ्टवेअरच्या स्पायवेअरचा हल्ला झाला आहे की नाही हे कळू शकणार नाही.

फ्रान्सने दिले चौकशीचे आदेश

आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार फ्रान्समध्ये कमीत कमी३७ फोन हॅक केले असून चौकशीत तसे पुरावे मिळाले आहेत. फ्रान्समधील वर्तमानपत्रातून दावा केला आहे की राष्ट्रपती माक्रो यांच्यावरोबरच सरकारी यंत्रणेतील १५ जणांची हेरगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचलेत का: 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news