ऑक्सिजन अभावी मृत्यू नाही : मोदी सरकारच्या उत्तरावर विरोधक संतापले | पुढारी

ऑक्सिजन अभावी मृत्यू नाही : मोदी सरकारच्या उत्तरावर विरोधक संतापले

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : ऑक्सिजन अभावी मृत्यू : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनच्या अभावामुळे मृत्यू झालाच नाही असा अजब दावा केंद्राने केला आहे. केंद्र सरकारच्या या निवेदनानंतर विरोधक संतप्त झाले आहेत.

आम आदमी पार्टी (आप) या मुद्यासंदर्भात संसदेत विशेषाधिकार प्रस्ताव तयारीत आहे. त्याचबरोबर, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीसंदर्भात काँग्रेसनेही याच संदर्भात तयारी सुरु केली आहे. काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल म्हणाले की, आपण आरोग्यमंत्री मनसुख मांडवीयांविरूद्ध विशेषाधिकार प्रस्ताव आणू.

अधिक वाचा 

आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह म्हणाले की, सरकारने या संकट काळात देशाला अनाथ पद्धतीने सोडून दिले. काय घडत आहे हे सरकारलाही माहित नव्हते. ‘आप’ या विषयावरील विशेषाधिकार प्रस्ताव संसदेत आणेल.

ऑक्सिजन अभावी मृत्यू : प्रियांका गांधींचा हल्लाबोल

काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही कडाडून हल्ला चढवला आहे प्रियांका गांधी यांनी ट्विट केले की कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या अभावामुळे मृत्यू झाले कारण सरकारने ऑक्सिजन निर्यातीत ७०० टक्के वाढ केली आहे. त्या म्हणाल्या की, ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी सरकारने टँकरची व्यवस्था केली नाही. या व्यतिरिक्त, रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट बसविण्याबाबत कोणतीच रुची दाखवली नाही.

गुन्हा दाखल करावा: संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आरोग्य राज्यमंत्र्यांच्या उत्तराबाबत सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

ते म्हणाले की, सरकारचे हे उत्तर ऐकल्यानंतर ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांचे काय झाले असेल? सरकारविरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे. सरकार खोटे बोलत आहे.

अधिक वाचा

मंगळवारी मोदी सरकारने राज्यसभेत सांगितले होते की दुसर्‍या लाटेदरम्यान राज्यांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली नाही.

काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल यांनी राज्यसभेत ऑक्सिजनच्या अभावामुळे झालेल्या मृत्यूंवर प्रश्न उपस्थित केला होता.

हे ही वाचलं का?

Back to top button