INDvsENG : वर्ल्ड कप सेमी फायनपूर्वी ‘हा’ गोलंदाज ‘अनफिट’! इंग्लंडचा दुसरा झटका

INDvsENG : वर्ल्ड कप सेमी फायनपूर्वी ‘हा’ गोलंदाज ‘अनफिट’! इंग्लंडचा दुसरा झटका
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : INDvsENG T20 World Cup Semi Final : भारताविरुद्धच्या टी-20 वर्ल्ड कप सेमी फायनलपूर्वी इंग्लंडच्या अडचणीत वाढ झाली आहे. डेव्हिड मलाननंतर, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. अॅडलेड ओव्हलवर भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी अयोजित केलेल्या सराव सत्रात तो सहभागी झाला नव्हता. मार्क वुड हा यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याने चार सामन्यांत नऊ बळी घेतले आहेत.

वुडने खबरदारी म्हणून नेटमध्ये गोलंदाजी करणे टाळत ऐच्छिक सराव सत्रात भाग घेतला नाही. अलीकडेच त्याच्या उजव्या कोपरावर दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यानंतर संपूर्ण उन्हाळ्यात तो संघाबाहेर होता. दुसरीकडे, जर वुड सेमी फायनलच्या सामन्यातून बाहेर पडला, तर त्याच्या जागी ख्रिस जॉर्डनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते. वुड हा इंग्लंडच्या धोकादायक गोलंदाजांपैकी एक आहे. सध्या सुरू असलेल्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत त्याने सर्वात वेगवान (154.74kph) चेंडू टाकला आहे. (INDvsENG T20 World Cup Semi Final)

वुडसोबतच इंग्लिश संघाचा स्टार फलंदाज डेव्हिड मलान दुखापतीमुळे महत्त्वाच्या सामन्यातून बाहेर पडू शकतो. सोमवारी संघाचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने याला दुजोरा दिला. सुपर-12 फेरीच्या शेवटच्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मलानला दुखापत झाली होती. त्यानंतर तो मैदानावर आला नाही. 142 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संघ अडचणीत असतानाही मलान फलंदाजीला आला नाही, यावरून त्याची दुखापत किती गंभीर आहे, हे समजू शकते. (INDvsENG T20 World Cup Semi Final)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news