Babar Azam Selfish : पाकच्या माजी क्रिकेटरने हाणला बाबर आझमला टोला, म्हणाला; ‘तो स्वार्थी..’ | पुढारी

Babar Azam Selfish : पाकच्या माजी क्रिकेटरने हाणला बाबर आझमला टोला, म्हणाला; ‘तो स्वार्थी..’

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तान क्रिकेट संघाला नेदरलँडकडून भेट म्हणून विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत स्थान मिळाले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या पराभवानंतर पाकिस्तानचे नशीब फिरले आणि बांगलादेशला पराभूत करून त्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. बाबरच्या नेतृत्वाखाली खेळणा-या या संघाचा सामना न्यूझीलंडशी आहे. हा पहिल्या उपांत्य फेरीचा सामना 10 नोव्हेंबरला सिडनी येथे खेळवला जाणार आहे. पण या मोठ्या सामन्यापूर्वी पाकचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) त्यांचा सध्याचा कर्णधार बाबर आझमवर (Babar Azam) निशाणा साधला आहे. खोचक ट्विटर करून एक प्रकारे आफ्रिदीने बाबरच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रयत्न केला आहे. (Babar Azam Selfish Shahid Afridi Criticism)

आफ्रिदीने विद्यमान पाकिस्तानी कर्णधार बाबरला सलामीला ओपनिंग न करण्याचा सल्ला दिला आहे. मोहम्मद रिझवानसह युवा फलंदाज मोहम्मद हारीसला डावाची सुरुवात करण्याची संधी द्यायला हवी, असेही त्याने मत व्यक्त केले आहे. आफ्रिदीने ट्विट केले की, ‘बाबर आझम, आम्हाला टॉप ऑर्डरमध्ये हारिस आणि शादाबसारखे फलंदाज हवे आहेत. कृपया रिझवानसह हारिसला ओपनिंगला पाठवण्याचा विचार कर. आणि तू तिस-या क्रमांकावर फलंदाजीस ये. सामने जिंकण्यासाठी तुम्हाला कणखर असायला हवे आणि फलंदाजीचा क्रम संतुलित आणि लवचिक असावा, असे आफ्रिदीने म्हटले आहे. (Babar Azam Selfish Shahid Afridi Criticism)

ट्विटशिवाय शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानी चॅनल साम टीव्हीशी केलेल्या संभाषणात म्हटले आहे की, ‘हारिसच्या धडाकेबाज फलंदाजीच्या कौश्यल्याचा वापर करणे आवश्यक आहे. बाबर तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो. बाबरने स्वतःला बदलणे गरजेचे आहे. तुलाच ओपनिंगला यायचं आहे हे काही वरून लिहून पाठवलेलं नाही. त्यामुळे बाबर स्वत:मध्ये बदल जरा कर. तुझ्यात एक स्वार्थीपणा दिसत आहे. कर्णधार म्हणून संघाच्या भल्याचा विचार कर, असा खोचक टोलाही त्याने लगावला आहे. (Babar Azam Selfish Shahid Afridi Criticism)

Back to top button