IND vs NZ : टीम इंडियाचा न्यूझीलंडवर ९० धावांनी विजय

IND vs NZ : टीम इंडियाचा न्यूझीलंडवर ९० धावांनी विजय
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाने तिसऱ्या वनडे सामन्यात 90 धावांनी पराभूत करत मालिका 3-0 ने जिंकली. भारताने दिलेल्या 386 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा फलंदाज डेवॉन कॉनवेने दिलेली कडवी झुंज अयशस्वी ठरली. त्याने 136 धावांची खेळी केली. भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुलने दिलेल्या पाठोपाठ धक्क्यांमुळे न्यूझीलंडची सामन्यावरची पकड कमी झाली. याचा फायदा भारतीय संघाने घेत न्यूझीलंडचा डाव 295 धावांवर गुंडाळला. त्यामुळे टीम इंडियाने सामना 90 धावांनी जिंकला. शार्दुलसह कुलदीप यादवने सामन्यात 3 बळी घेतले. (IND vs NZ)

टीम इंडियाने दिलेल्या 386 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर फिन ऍलन खाते न उघडता बाद झाला. हार्दिक पंड्याने त्याला माघारी धाडले. यावेळी संघाचीही धावसंख्या 0 होती. हार्दिकने या ओव्हरमध्ये तीन वाईड बॉल टाकले. (IND vs NZ)

कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या शतकांच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 9 विकेट गमावून 385 धावांचा डोंगर रचला. गिलने 78 चेंडूत 112 तर रोहितने 85 चेंडूत 101 धावा केल्या. या दोघांशिवाय हार्दिक पांड्यानेही शेवटच्या षटकांमध्ये तडाखेबाज फलंदाजी करून 38 चेंडूत 54 धावा फटकावल्या. न्यूझीलंडकडून जेकब डफी आणि ब्लेअर टिकनर यांनी 3-3 बळी घेतले.

26 षटकांत भारताची धावसंख्या विकेट न गमावता 212 धावा होती. त्यानंतर रोहित आऊट झाला. काही वेळाने शुभमन गिलही पॅव्हेलियनमध्ये परतला. विराट कोहली (36), इशान किशन (17) आणि सूर्यकुमार यादव (14) हे मधल्या फळीतील दिग्गज फलंदाज जास्त वेळ क्रीजवर टिकू शकले नाहीत. हार्दिक आणि शार्दुल ठाकूर यांनी सातव्या विकेटसाठी 54 धावा जोडून भारताला पुन्हा रुळावर आणले.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताची ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. टीम इंडियाने यापूर्वी किवींविरुद्ध 8 मार्च 2009 रोजी ख्राइस्टचर्चमध्ये सर्वात मोठी धावसंख्या केली होती. त्यावेळी भारताने 50 षटकांत 4 गडी गमावून 392 धावा केल्या होत्या.
पाहुण्या न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात 2 बदल करण्यात आले, तर न्यूझीलंडने एक बदल केला. मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली असून त्यांच्या जागी उमरान मलिक आणि युझवेंद्र चहलला स्थान देण्यात आले. त्याचवेळी किवी कर्णधार टॉम लॅथमने शिपलेच्या जागी डफीचा समावेश केला.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news