Amol kale : संजय राऊतांनी उल्लेख केलेले ‘कौन है ये अमोल काळे’ झाले प्रकट !
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : माझी हेतुपुरस्सर बदनामी करणाऱ्यां विरूद्ध कायदेशीर कारवाई प्रारंभ करीत असल्याची माहिती अमोल काळे ( Amol kale ) यांनी एका निवेदनाद्वारे दिली. शिवसेना प्रवक्ते व खासदार संजय राऊत ( sanjay raut ) यांनी मुंबई येथे घेतलेल्या पत्रपरिषदेत "कौन है ये अमोल काळे, उसे कहा छुपा के रखा है' असे प्रश्न उपस्थित केल्यानंतर अमोल काळे चर्चेत आले.
वृत्तवाहिन्या तसेच समाजमाध्यमांवर माझ्या संदर्भात काही नेत्यांनी केलेली वक्तव्ये पूर्णत: दिशाभूल करणारी असल्याचे काळे यांनी निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्र शासनाचे कुठलेही कंत्राट वा टेंडर मी घेतलेले नाही. माझ्या खाजगी व्यवसायाचे संपूर्ण तपशील माझ्या प्राप्तीकर विवरणात नमुद असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.
फडणवीस यांचे निकटस्थ आहेत काळे ( Amol kale )
अमोल काळे हे ( Amol kale ) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( devendra fadnavis ) यांचे निकटस्थ मानले जातात. फडणवीस आणि काळे हे बालपणापासूनचे मित्र आहेत. काळेंचा कन्स्ट्रक्शन आणि आयटी क्षेत्रात मोठा व्यवसाय आहे. २०१४ मध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर एका इंग्रजी दैनिकात एक बातमी आली होती. त्यात काळे यांनी फडणवीसांच्या शनी भक्तीबद्दल सांगितले आहे. फडणवीसांना शनीशिंगणापुरला जायला खूप आवडते. ते रात्री अपरात्री यायचे आणि तासाभरात जाऊन येऊ म्हणून आम्हाला शनीशिंगणापुरला घेऊन जात असत, असे काळे यांनी सांगितले आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये बाहेरच्या माणसांची सहजासहजी एंट्री होत नाही. हे अशक्य मानले जाते. पण, अमोल काळे यांनी २०१९ मध्ये एमसीएच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती आणि ते निवडून आले होते. फडणवीसांच्या शिफारशीमुळेच हे शक्य झाल्याचे तेव्हा बोलले गेले. बाळ महादळकर पॅनेलकडून ते लढले होते. फडणवीसांच्या शिफारशीवरून अमोल काळे यांची तिरूमला तिरूपती देवस्थानावर २०१९ मध्ये विशेष निमंत्रीत म्हणून नियुक्ती झाली होती.
अधिक वाचा :

