Ishant Sharma : इशांत शर्माने केलेल्या विधानावरून घेतला यू-टर्न!

Ishant Sharma : इशांत शर्माने केलेल्या विधानावरून घेतला यू-टर्न!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने (Ishant Sharma) केलेल्या विधानावरून आता यू-टर्न घेत रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ३३ वर्षीय वेगवान गोलंदाजाने यापूर्वी भारताच्या देशांतर्गत खेळल्या जाणाऱ्या लीगमध्ये खेळण्यास नकार दिला होता. परंतु, आता तो दिल्लीकडून खेळण्यास तयार आहे.

भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माने यू-टर्न घेत रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ३३ वर्षीय वेगवान गोलंदाजाने यापूर्वी भारताच्या देशांतर्गत क्रिकेट लीगमध्ये खेळण्यास नकार दिला होता. परंतु आता तो दिल्ली संघात सामील होण्यास तयार आहे. इशांत झारखंडविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात तो दिल्लीकडून खेळण्यास उपलब्ध असेल. इशांतला पाच दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यामुळे तो तामिळनाडूविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार,"इशांत आज येत आहे. तो दुसऱ्या सामन्यापासून खेळण्यास उपलब्ध असेल. वेगवान गोलंदाज पहिल्या सामन्यापासून उपलब्ध झाले असते तर संघासाठी चांगले झाले असते, परंतु त्यांचे पुनरागमन झाले आहे. त्यांच्या येण्याने संघ अधिक मजबूत होईल." इशांत सध्या खराब फॉर्ममुळे टीम इंडियातून बाहेर आहे. परंतु त्याला आगामी श्रीलंकेविरूध्दच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.

या कारणामुळे इशानने घेतला केलेल्या विधानावरून यू-टर्न

दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए) च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आयपीएल लिलावात इशानवर कोणत्याही संघाने त्याच्यावर बोली न लावल्याने इशांतने रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्याचा त्याने विचार बदलला. "तो जरी रणजी करंडक खेळला नसला तरी, कोणत्याही संघाने त्याच्याबद्दल विचार करण्याचे कारण नाही. राष्ट्रीय निवडकर्त्यांनी त्याचा पुनर्विचार करावा, तरीही त्याला खेळण्याची गरज आहे. (Ishant Sharma )

जर त्याला आयपीएलमध्ये संधी मिळाली असती तर तो आयपीएल खेळू शकला असता. भारताचा आणखी एक वेगवान गोलंदाज नवदीप सैनी देखील झारखंड सामन्यासाठी गुवाहाटीला पोहचणार आहे. सैनी अहमदाबादमध्ये भारतीय एकदिवसीय संघासोबत होता. गुवाहाटीमध्ये आल्यानंतर त्याला विलगीकरणात ठेवण्याची गरज भासणार नाही.

यश धूल देणार सलामी

अंडर-१९ विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार आणि युवा फलंदाज यश धूल दिल्लीसाठी डावाची सुरुवात करू शकतो. तर दुसऱ्या बाजूने ध्रुव शौरी त्याला सलामीसाठी साथ देऊ शकतो. "तो सलामीला तयार आहे. तो फॉर्ममध्ये आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news