नाशिक शहरात किती मनसे कार्यकर्त्यांना अटक? कुणावर काय कारवाई ?

नाशिक शहरात किती मनसे कार्यकर्त्यांना अटक? कुणावर काय कारवाई ?
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मशिदीवरील भोंगे न उतरवल्यास हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केल्यानंतर शहर पोलिस सतर्क झाले आहेत. रमजान ईदसाठी तैनात असलेला पोलिस बंदोबस्त दुसर्‍या दिवशीही कायम ठेवण्यात आला होता. त्यामुळे शहरात तुरळक घटना वगळता इतर कोठेही सार्वजनिक शांतता भंग होईल, अशी घटना घडली नाही. या प्रकरणी शहरात चार गुन्हे दाखल झाले असून, 30 हून अधिक मनसे कार्यकर्त्यांना पकडले आहे.

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलिस उपआयुक्त, 7 सहायक पोलिस आयुक्त, 45 पोलिस निरीक्षक, 79 सहायक व उपनिरीक्षक, 956 पुरुष व महिला अंमलदार, 600 होमगार्डचे जवान, दोन स्ट्रायकिंग फोर्स, एक एसआरपीएफ तुकडी, असा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात असून, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक व इतर शाखेकडील पोलिसांचा फौजफाटाही बंदोबस्तासाठी ठेवण्यात आला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शहरात बुधवारी (दि. 4) मध्यरात्रीपासूनच पोलिसांचा बंदोबस्त सतर्क झाला. मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यासोबतच त्यांची धरपकड सुरू झाली होती. त्यात शहरात वास्तव्य न करण्यासंदर्भात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 (1)(2) 119 जणांना, तर फौजदारी 149 नुसार 270 जणांवर व 151 (1) (3) 27 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांवर ताण वाढला
भोंग्याचे आंदोलन कधी संपेल याचा अंदाज येत नसल्याने पोलिसांचा हा बंदोबस्त अजून काही दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण वाढला आहे. राज्यपाल, उपमुख्यमंत्री यांच्या बंदोबस्तासह रमजान ईद, अक्षय तृतीयाचा बंदोबस्त झाल्यानंतर बंदोबस्त कायम असल्याने पोलिसांवरील इतर कामकाज पूर्ण करण्याचाही ताण वाढला आहे.

चोख बंदोबस्त
शहरातील जुने नाशिक परिसरातील मशीद व मंदिर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही संशयित व्यक्ती आढळून आल्यास त्याची चौकशी केली जात होती. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

आवाजाची तीव्रता कमी
पहाटे 5 ची अजान वगळता इतर चार वेळच्या अजान भोंग्यावरून देण्यात आल्या. भोंग्याच्या आवाजाची तीव—ता मोजण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याचे आढळून आले. मात्र, भोंग्याचा आवाज कमी असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news