House of the Dragon चा धुमाकूळ, गेम्स ऑफ थ्रोन्सलाही पछाडलं

House of the Dragon
House of the Dragon
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'हाऊस ऑफ द ड्रॅगन' (House of the Dragon) ची दीर्घकाळ प्रतीक्षा केल्यानंतर आता याचे प्रीमियर झाले आहे. 'गेम ऑफ थ्रोन्‍स' च्या प्रचंड यशानंतर हाऊस ऑफ ड्रॅगनच्या प्रीक्‍वलकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. तुलना होणं साहजिक होतं. पण, तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, 'हाऊस ऑफ द ड्रॅगन' च्या पहिल्या एपिसोडलो 'गेम ऑफ थ्रोन्‍स' (Game of Thrones) च्या तुलनेत चौपट व्ह्युव्ज मिळाले आहेत.

'हाऊस ऑफ द ड्रॅगन' ला मिळाले १० मिलियन व्ह्युव्ज

एचबीओ मॅक्‍सवर 'हाऊस ऑफ द ड्रॅगन' चा प्रीमियर झाला. रिपोर्टनुसार, पहिला एपिसोड जवळपास १० मिलियन (एक कोटी) लोकांनी पाहिला. हा आकडा केवळ अमेरिकेचा आहे. टीव्ही आणि ओटीटी व्ह्युव्ज मिळून ९.९८६ मिलियन व्ह्युव्ज मिळाले आहेत. 'हाऊस ऑफ द ड्रॅगन' डिज्‍नी प्‍लस हॉट स्‍टार इंडियावर पाहता येईल.

केवळ २.२ मिलियन लोकांनी पाहिला होता 'गेम ऑफ थ्रोन्‍स'

एचबीओने 'गेम ऑफ थ्रोन्‍स' २०११ ते २०१९ दरम्यान, ऑन एअर केलं होतं, हे पाहून फॅन्समध्ये जबरदस्‍त क्रेझ पाहायला मिळाले होते. भारतातदेखील गेम्स ऑफ थ्रोन्स प्रेक्षकांचाय पसंतीस उतरला होता. व्ह्युव्ज रेकॉर्ड प्रकरमात 'हाऊस ऑफ द ड्रॅगन'ने मागे टाकले आहे. १७ एप्रिल, २०११ रोजी प्रसारित झालेल्या 'गेम ऑफ थ्रोन्‍स' च्या पहिल्या एपिसोडला २.२ मिलियन व्ह्युव्ज मिळाले होते.

'गेम ऑफ थ्रोन्‍स'चा शेवटचा एपिसोड १९ मे, २०१९ रोजी प्रसारित झाला होता. या एपिसोडला १३.६१३.६१ मिलियन व्ह्युज मिळाले होते. आता 'हाऊस ऑफ द ड्रॅगन' हे रेकॉर्ड तोडू शकतो की नाही, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

हेदेखील वाचा-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news