पिंपरी : पॉवर हाऊस चौकातील पालिकेचा एलईडी बोर्ड बंद

पिंपरी : पॉवर हाऊस चौकातील पालिकेचा एलईडी बोर्ड बंद

पिंपरी : पॉवर हाऊस चौक येथील पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने लावण्यात आलेला एलईडी बोर्ड लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सूचना आणि योजना याची माहिती या एलईडी बोर्डच्या माध्यमातून दिली जात आहे. त्यामुळे या योजना नागरिकांंपर्यंत पोहोचण्यास मदत होते. तसेच, स्वाईन फ्ल्यू व कोरोना सारख्या रोगांवर घ्यावयाची काळजी यासारखी माहितीही दिली जात असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी लवकरात लवकर एलईडी बोर्ड सुरू करण्याची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news