

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोना हा शब्द उच्चारला तरी मास्क, सँनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग हे शब्द आपसुकच आठवतात. २०२० मध्ये संपूर्ण जगावर आलेले कोरोना महासंकटानंतर हे शब्द आपल्या जीवनशैलीचा भाग झाले होते. आता मागील एक वर्षापासून कोरोनामुक्तीकडे बहुतांश देशांची वाटचाल सुरु झाली आहे. अनेक देशांनी कोरोना प्रतिबंधासाठी घालण्यात आलेले नियम शिथिल केले आहेत. आता हाँगकाँगमध्येही मास्क सक्ती रद्द करण्यात आली आहे. ( Hong Kong will scrap mask mandate ) तब्बल ९४५ दिवसांच्या सक्तीनंतर हाँगकाँगमध्ये मास्क सक्तीचा नियम संपुष्टात आल्याचे 'ब्लूमबर्ग'च्या अहवालात म्हटले आहे. सर्वाधिक काळ मास्क सक्ती कायम राहिलेले महानगर म्हणून हाँगकाँगची ओळख झाली होती.
बुधवार, १ मार्च २०२३ पासून हाँगकाँग शहरात मास्क सक्ती असणार नाही, अशी माहिती हाँगकाँगचे सीईओ जॉन ली यांनी दिली. जगात सर्वाधिक काळ मास्क सक्ती असणारे शहरांपैकी एक शहर म्हणून हाँगकाँगची ओळख होती. आता आम्ही १ मार्च २०२३ पासून पूर्णपणे सामान्य स्थितीत परत येत आहोत. हाँगकाँग पुन्हा एकदा सामान्य स्थितीत आले आहे हे दर्शविण्यासाठी हा एक संदेश आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मास्क सक्ती हटविण्याबरोबर आता पर्यटन व्यवसाय व उद्योगाला चालना देण्यासाठी सरकार 'हॅलो हाँगकाँग' ही नवीन मोहिम सुरु करणार आहे. हाँगकाँग आणि मकाऊ या दोन्ही ठिकाणी गेल्या तीन वर्षांपासून चीनच्या झीरो कोव्हिड पॉलीसीची कटेकोर अंमलबजावणी करण्यात आली होती. २०२० पासून येथे मास्क सक्ती कायम होती. आता हाँगकाँगमध्ये मास्क सक्ती असणार नाही.रुग्णालय व उच्च जोखमीच्या ठिकाणी कर्मचार्यांनी मास्क घालणे आवश्यक आहे की नाही, याबाबत निर्णय स्वत: घेवायचा आहे, असेही जॉन ली यांनी म्हटले आहे.
पर्यटन व्यवसायाला खीळ बसल्यामुळे हाँगकाँगमधील अनेक व्यावसायिक व स्थानिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांवर टीका केली होती. नियमांमध्ये सूट देण्याबाबत लवकरा लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली होती. आता हाँगकाँगमध्ये तब्बल ९४५ दिवसांनी मास्क सक्ती रद्द होण्याबरोबर कोरोना प्रतिबंधक नियम शिथिल केल्याने आता पर्यटक व्यवसायाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
हेही वाचा :