Green Strategic Partnership : डेन्मार्कचे राजकुमार फ्रेडरिक आंद्रे यांनी केली भारताची स्तुती, पंतप्रधान मोदींविषयी म्हणाले, | पुढारी

Green Strategic Partnership : डेन्मार्कचे राजकुमार फ्रेडरिक आंद्रे यांनी केली भारताची स्तुती, पंतप्रधान मोदींविषयी म्हणाले,

पुढारी ऑनलाइन डेस्क : Green Strategic Partnership : डेन्मार्कचे राजकुमार फ्रेडरिक आंद्रे हेन्रिक ख्रिश्चन यांनी भारताची स्तुती केली आहे. हरित भविष्याकडे लक्ष वेधत त्यांनी भारताने याबाबत केलेल्या प्रगतीवर प्रकाश टाकला आहे. भारतात झालेले बदल हे आश्चर्यकारक आहे, असे ते म्हणाले. नुकत्याच झालेल्या भारत-डेन्मार्क ग्रीन अँड सस्टेनेबल प्रोग्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी भारताची स्तुती केली आहे. तसेच भारत आणि डेन्मार्कच्या भागीदारी मजबूत असून ती अशीच पुढे चालू राहावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने याचे वृत्त दिले आहे. Green Strategic Partnership : या परिषदेत हेन्रिक म्हणाले, भारतात दिसलेले बदल आश्चर्यकारक आहेत. लोक ज्या बदलांमधून गेले त्यानंतरही भारताचे हरित संक्रमण सुरू आहे. एका धरोणात्मक हरित भागीदारीमध्ये भारत आणि डेन्मार्क सहभागी झाले आहेत. हे परस्पर फायदेशीर असून ते दोघेही साध्य करू शकतील, असा करार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मे 2022 च्या डेन्मार्क भेटीदरम्यान, भारत आणि डेन्मार्क यांनी ग्रीन हायड्रोजन, अक्षय ऊर्जा आणि सांडपाणी व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित करून हरित धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यावर सहमती दर्शवली होती. त्यानंतर नुकतीच पंतप्रधान मोदी यांनी मोठ्या शिष्टमंडळासह डेन्मार्कला भेट दिली. यावेळी राजकुमार फ्रेडरिक म्हणाले, कोपनहेगनमध्ये मोदी यांचे स्वागत करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.

Green Strategic Partnership : ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपबाबत बोलताना हेन्रिक म्हणाले,

“आज दोन्ही देशांमधील भागीदारी मजबूत आहे. आम्ही दोघेही हरित भविष्याकडे वाटचाल करत आहोत. या परिषदेद्वारे भारत आणि डेन्मार्क सर्वांसाठी हरित भविष्य साध्य करण्यासाठी एक नवीन पाऊल पुढे टाकत आहेत. ही भेट एकत्रितरित्या समृद्ध प्रवास करण्यासाठी, अशीच चालू राहो ही माझी नम्र इच्छा आहे.

ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप ही राजकीय सहकार्य वाढवण्यासाठी, आर्थिक संबंध आणि हरित वाढ वाढवण्यासाठी, रोजगार निर्माण करण्यासाठी आणि पॅरिस करार आणि संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या महत्त्वाकांक्षी अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करून जागतिक आव्हाने आणि संधींना तोंड देण्यासाठी सहकार्य मजबूत करण्यासाठी परस्पर फायदेशीर व्यवस्था आहे.” Green Strategic Partnership भारत आणि डेन्मार्क या दोघांचीही हवामान अजेंड्यात महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे आहेत.

हे ही वाचा :

Elon Musk : एलॉन मस्क पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, जाणून घ्या किती वाढली संपत्ती

Airtel ची सेवा महागणार, सुनील मित्तल यांच्याकडून दरवाढीचे संकेत

Back to top button