मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना केंद्राचा दिलासा : ७४ औषधांच्या किमती निश्चित | पुढारी

मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना केंद्राचा दिलासा : ७४ औषधांच्या किमती निश्चित

पुढारी ऑनलाईन : नॅशनल फार्मासिटिकल प्रायसिंग अॅथॉरिटीने (NPPA) मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर काही आजारांवरील ७४ औषधांच्या किमती निश्चित केल्या आहेत. (Drug Price Control)

NPPAने Drugs (Prices Control) Order 2013 नुसार हा निर्णय घेतला आहे. NPPAच्या २१ फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत या संदर्भात निर्णय झाला होता. यानुसारचे आदेश नुकतेच लागू करण्यात आले आहेत.

मधुमेहावरील Dapagliflozin Sitagliptin आणि Metformin Hydrochloride या औषधांच्या एक गोळीची किंमत २७.७५ रुपये इतकी करण्यात आली आहे. तर उच्च रक्तदाबावरील Telmisartan आणि Bisoprolol Fumarate या औषधांच्या किमतीही निश्चित करण्यात आल्या आहेत.

Sodium Valproate (20mg)ची किंमत एका गोळीसाठी ३.२० रुपये, Filgrastim injectionची किंमत १,०३४.५१ रुपये असेल. Hydrocortisone च्या एक गोळीची किंमत १३.२८ रुपये इतकी असणार आहे.

देशातील औषधांच्या किंमतीवर नियंत्रण आणि पुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी NPPAकडे असते. देशात काही औषधे नियंत्रित औषधांच्या यादीत आहेत. तर बरीच औषधे अनियंत्रित यादीत असतात. अनियंत्रित यादीतील औषधाच्या किंमतीही आवाक्याबाहेर असणार नाहीत, याची खबरदारी NPPAघेत असते.

हेही वाचा

Back to top button