Britney Spears Wedding : ब्रिटनी स्पीयर्सच्या तिसऱ्या लग्नात पहिल्या पतीचा राडा

Britney Spears Wedding : ब्रिटनी स्पीयर्सच्या तिसऱ्या लग्नात पहिल्या पतीचा राडा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : हॉलिवूडची पॉप सिंगर ब्रिटनी स्पीयर्स आणि तिचा बॉयफ्रेड सॅम असगरी नुकतेच तिसऱ्यांदा लग्न बंधनात (Britney Spears Wedding) अडकले आहे. ब्रिटनी स्पीयर्सचे हे तिसरे लग्न आहे. परंतु. या लग्नात ब्रिटनी स्पीयर्सचा पहिला पती जेसन अलेक्झांडरने पोहोचल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

ब्रिटनीचे पती सॅमचे प्रतिनिधी ब्रँडन कोहेन यांनी या लग्नाबबात खुलासा केला आहे. यात त्यांनी 'आम्ही खूप आनंदी आहोत की, हा दिवस पाहायला मिळाला. आजच्या दिवशी ब्रिटनी आणि सॅम विवाह बंधानात अडकले आहेत. या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहात होतो. गेले नऊ महिन्यांच्या एंगेजमेंटनंतर दोघांनी अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने सर्वजण आनंदीत आहेत. असे म्हटले आहे. यावरून मोजक्यात नातेवाईकांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडला आहे.

याबबातची माहिती मिळताच सोशल मीडियावरून दोघांवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. ब्रिटनी आणि तिच्या बॉयफ्रेड सॅम असगरी यांची पहिली भेट २०१६ मध्ये स्लंबर पार्टीच्या म्युझिक व्हिडिओदरम्यान झाली होती. यानंतर दोघांनी एकमेंकाना डेट करण्यास सुरूवात केली. यानंतर दोघांनी लग्न ( Britney Spears Wedding ) केले आहे.

याच दरम्यान ब्रिटनी स्पीयर्सचा पहिली पती जेसन अलेक्झांडरने हा लग्न सोहळ्यात पोहोचल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण पसरले. यावेळी सभारंभ मंडपाबाहेरील सुरक्षा रक्षकांनी जेसनला अडवले आणि आत जाता येणार नसल्याचे सांगितले. यानंतर जेसनने 'ब्रिटनी ही माझी पहिली पत्नी आहे. तिने मला लग्नाचे आमंत्रण दिलं आहे.' असे सांगितले. तसेच तो यावेळी इंस्टाग्रामवर लाईव्ह करत होता. या सगळ्यामुळे विवाहाच्या ठिकाणी काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

व्हेंचुरा काउंटी शेरीफ कॅप्टन कॅमेरॉन यांनी सांगितले की, पहाटे २ वाजण्याच्या सुमारास याबद्दल तक्रार करणारा कॉल आला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. ब्रिटनी आणि अलेक्झांडर यांचे लग्न २००४ मध्ये झाले होते. यानंतर तिने केविन फेडरलाइनसोबत लग्न केले. ब्रिटनी आणि केविन याचा २००७ मध्ये विभक्त झाले. ब्रिटनीला दोन जुळ्या मुलांची आई आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news