Zilla Parishad Nashik : हरकती, सूचनांवर 13 ला होणार सुनावणी | पुढारी

Zilla Parishad Nashik : हरकती, सूचनांवर 13 ला होणार सुनावणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक 2022 च्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारूप प्रभाग रचनेवर घेतलेल्या हरकतींची सुनावणी प्रशासकीय कारणास्तव 10 ऐवजी 13 जून रोजी विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता होणार असल्याचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी प्रसिद्धिपत्रकान्वये कळविले आहे.

पत्रकात नमूद केल्यानुसार, राज्य निवडणूक आयोगामार्फत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक 2022 मध्ये मुदत संपणार्‍या जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या संदर्भात नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसाठी गटाची व पंचायत समिती गणाची प्रारूप प्रभाग रचनेच्या कार्यक्रमाची अधिसूचना 2 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार 2 जून 2022 ते 08 जून या कालावधीत सदर प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविण्यात आलेल्या होत्या.

सदर हरकती व सूचनांवर होणारी सुनवाणी प्रशासकीय कारणास्तव 10 ऐवजी 13 जूनला होणार असल्याने सुनावणीबाबत झालेल्या या बदलाची हरकतधारकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी शासकीय प्रसिद्धिपत्रकान्वये कळविले आहे.

हेही वाचा :

Back to top button