

पुढारी ऑनलाईन डेस्क : जसजसा उन्हाळा वाढत जाईल तसे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत असतात. त्यापैकी एक म्हणजे उष्माघात. अलिकडे उष्माघाताचे प्रमाण वाढत असल्याचे आपल्या निदर्शनास आले असेल. उष्ण आणि दमट हवामानाच्या ठिकाणी या त्रासाचे प्रमाण अधिक असते. पण काहीवेळा शारीरिक श्रम, निर्जलीकरण आणि विशिष्ट औषधांमुळे देखील उष्माघात होऊ शकतो. जाणून घेवूया उष्माघाताची लक्षणे आणि उपाय याविषयी. (Heatstroke)
उष्माघात हा उन्हाळ्यात होणारा आजार आहे. तो अधिक तापमानामुळे होतो. शरीरातील उष्णता नियंत्रित न केल्यामुळे उष्माघाताची लक्षणे जाणवायला लागतात. ज्यामध्ये शरीराच्या काही भागात आंशिक किंवा पूर्ण वेदना, त्वचेचा रंग जास्त काळवंडणे, भूक न लागणे, तापमान वाढणे, चक्कर येणे, डोकेदुखी, थकवा, घाम येणे इत्यादी लक्षणे दिसतात. उष्माघात टाळण्यासाठी वेळोवेळी पाणी पिणे, स्वत:ला थंड ठेवणे, सूर्यप्रकाश टाळणे इत्यादी फायदेशीर ठरते.
काहीवेळा उष्माघात म्हणजे काही माहित नसल्याने किंवा त्याची लक्षणे माहिती नसल्याने हा आजार गंभिर रुप धारण करु शकतो. या उष्माघाताची पुढील लक्षणे आहेत.
नुकतचं महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रविवारी (दि.१६) आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात ११ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. तसेच अन्य काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर हा सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. जर तुम्हाला उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हेही वाचा