यंदाचा उन्हाळा अधिक ‘कूल’ बनविण्‍यासाठी अशी करा सनग्लासेसची निवड | पुढारी

यंदाचा उन्हाळा अधिक 'कूल' बनविण्‍यासाठी अशी करा सनग्लासेसची निवड

यंदाचा उन्हाळा अधिक कूल आणि स्टायलिश बनवण्यासाठी सनग्लासेसची नेमकी निवड कशी करायची हे माहीत हवे. फक्त स्टाईलचा विचार न करता त्याचा योग्य उपयोग कसा होऊ शकतो, हेही पाहिल पाहिजे. जाणून घेवूया सनग्‍लासेसची निवड करताना कोणत्‍या बाबी महत्त्‍वाच्‍या ठरतात याविषयी…

आकारांमधील वैविध्य

सनग्लासेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आकार उपलब्ध असतात. त्यात प्रामुख्याने एव्हीएटर, वेफेरर आणि रॅपराऊंड अशा स्टाईलस् बाजारात उपलब्ध आहेत. आपल्या चेहऱ्यांच्या आकारानुसार योग्य शेपचे सनग्लासेस निवडावेत. ॲथलेटिक सनग्लासेस हा देखील पर्याय चांगला आहे. याचा लूक थोडासा स्लीम असतो आणि चेहऱ्यावर आडव्या पट्ट्याप्रमाणे फिट बसणारा असतो. त्यामुळे कुठल्याही बाजूने सूर्यकिरणे डोळ्यापर्यंत थेट पोहोचत नाहीत.

पोलाराईज्ड आणि अँटी रिफ्लेक्टीव लेन्स असलेले सनग्लासेस निवडावे

सूर्याच्या अतिनील किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करणे ही सनग्लासेसचे सर्वात महत्वाचे काम आहे. म्हणूनच आपण निवडलेले सनग्लासेस हे सूर्याच्या अतिनील किरणांचा १०० टक्के रोखणारे आहेत का, याची खात्री करून घेणे. तीव्र उन्हाच्या वेळेस घराबाहेर पडणे अपरिहार्य असल्यास पोलाराईज्ड आणि अँटी रिफ्लेक्टीव लेन्स असलेले सनग्लासेस निवडावे त्यामुळे डोळ्याचे अधिक संरक्षण होते. तसेच ग्लासचा रंग अर्थात फिल्टर कसा आहे, यावरून सूर्यप्रकाश वेगवेगळ्याप्रकारे फिल्टर होतो. त्यामुळे ग्लासचा रंगसुद्धा आपली गरज ओळखून निवडावा.

ड्रायव्हिंग करताना कोणत्‍या सनग्‍लासेस उपयुक्‍त ठरतात?

ग्रे शेडमधील ग्लास असल्यास केवळ प्रकाशाची तीव्रता कमी होते. ड्रायव्हिंगसाठी हा रंग चांगला ठरतो. अंबर आणि ब्राऊन लेन्सेस असल्यास निळा प्रकाश कमी करतो. शिवाय त्याची तीव्रता ही कमी करतो. तसेच वरच्या भागात गडद आणि खालच्या भागात फिकट शेड असणारी ग्लास ही कारच्या विंडशिल्डप्रमाणे काम करते. म्हणजे वरच्या बाजूने येणार सुर्यप्रकाश आडवते. पण त्यामुळे समोरचे दृश्य गडद दिसत नाही.

तुमची गरज लक्षात घेऊन  निवड करा

अशा प्रकारे सनग्लासची निवड करताना त्यामागचे शास्त्र प्रमाणात जाणून घ्यावेत आणि आपण कोणत्यावेळी, सनग्लासेस वापरणार आहोत, आपली गरज काय आहे, हे लक्षात घेऊन त्याची निवड करावी; अर्थात हे सगळे करत असताना चेहऱ्याचा आकार आणि लूक या दोन गोष्टी आवश्यक लक्षात ठेवाव्यात.

वर्षा शुक्ल

Back to top button