HBD Sharad Pawar : शरद पवारांना अशी सुचली होती ‘आयपीएल’ची कल्पना….

sharad pawar
sharad pawar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८२ वा वाढदिवस. शरद पवार अन् क्रिडा हे समीकरण फार मोठे आहे. ठाकरे सिनेमात एक प्रसंग आहे. ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे शरद पवारांना (HBD Sharad Pawar) चहा देण्यासाठी येतात आणि शरद पवारांना विचारतात की, तुम्हाला क्रिकेट पहायला आवडते की नाही. तेव्हा शरद पवार नकार देतात. आणि बाळासाहेब ठाकरे म्हणतात की तुला समजलं नाही जर शरदरावांना एखाद्यी गोष्ट आवडत नाही म्हटले असतील तर त्यांना त्यामध्ये जास्तचं आवड असते. (HBD Sharad Pawar) आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया आयपीएल विषयीची ही खास गोष्ट…

शरद पवारांचे सासरे सदू शिंदे हे क्रिकेटपटू होते. सदू शिंदे यांचे निधन झाल्यानंतर विजय मर्चेंट यांनी सदू शिंदे यांच्या गौरवार्थ एक सामना आयोजित केला होता. या सामन्यातून पाच हजार रुपयांचे उत्पन्न आले होते. मिळालेले उत्पन्न शरद पवार यांच्या पत्नींच्या घरी देण्यात आले होते. या पैशातूनच शरद पवारांच्या पत्नींच्या घरातील सर्वांचे शिक्षण पूर्ण झाले होते.

इंग्लंड, ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटसाठी निष्ठेने काम करणारे लोक होते तसं भारतात नव्हतं. एकदा शरद पवार कोल्हापुरात असताना सकाळी त्यांना चिठ्ठी आली. भाऊसाहेब निंबाळकर यांनी चिठ्ठी पाठवली होती. या चिठ्ठीमध्ये भेटण्यासाठी विनंती केली होती. शरद पवारांनी भेटण्यासाठी होकार दिला. तेव्हा भाऊसाहेब निंबाळकर ट्रेक सुट, बुट घालून भेटण्यासाठी आले होते. सकाळी काय काम काढलतं भाऊसाहेब अस शरद पवारांनी विचारल्यानंतर काम काही नाही. सध्या माजी कसोटीपटू असल्याने पेंशन मिळते. दरमहा ३५ हजार रुपये येतात. त्यामुळे रोज मुलांना प्रशिक्षण देतो अस भाऊसाहेब निंबाळकर म्हणाले, तेव्हा ८९ वर्षांचे निंबाळकरांमध्ये एवढा हुरुप शरद पवार यांनी पाहिला. पेंशन असल्यामुळे समाधानाने ते प्रशिक्षण देत आहेत हे त्यांच्या लक्षात आले. खेळाडूंच्या आर्थिक प्रश्नांकडे लक्ष दिले तर अनेक चांगले खेळाडू घडू शकतात हे शरद पवारांना जाणवल होते.

बीसीसीआय आणि आयसीसीचे अध्यक्ष झाल्यानंतर शरद पवारांची अनेक देशांशी आणि खासकरुन क्रिकेटशी संबंधित व्यक्तींशी जवळीक वाढली. शरद पवार जेव्हा इंग्लंडला भेटीसाठी जातील तेव्हा तेथील फुटबॉलच्या सामन्यांमधील चुरस पहायचे. स्थानिक शहरांचे क्लब असायचे. यामधून सामन्यांचे आयोजन करण्यात येत असे याला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळायचा आणि सामनेही रंगतदार व्हायचे. क्रिकेटमध्येही असं काही करता येईल का? असा प्रश्न शरद पवार यांना पडला. शरद पवार यांनी ही कल्पना ललित मोदी यांना सांगितली आणि या कल्पनेला विकसित करण्याची जबाबदारीही शरद पवारांनी ललित मोदी यांच्यावर सोपवली.

ललित मोदी सतत चार महिने शरद पवारांच्या या संकल्पनेवर काम केले, ललित मोदी यांनी शरद पवार यांच्या संकल्पनेला खऱ्या अर्थाने मूर्त रुप देण्याचा प्रयत्न केला. ललित मोदी यांनी शरद पवारांकडे 'इंडियन प्रिमियर लिग'या रूपात पुढे नेता येईल असे सांगितले. शरद पवार आणि ललीत मोदी यांच्या या संकल्पनेला फार मोठा प्रतिसाद मिळाला. भारतातील मोठ्या उद्योजकांनी यामध्ये गुंतवणूक केली. आयपीएलमुळे बीसीसीआयकडे पैशांची कमी राहिली नाही अनेक निवृत क्रिकेटपटूंचे आर्थिक प्रश्न सुटू लागले.

भारतातील राज्यपातळीवर खेळणाऱ्या खेळाडूंना अनेक दिग्गजांबरोबर खेळण्याची संधी मिळाली. अनेक दिग्गज क्रिकेट पटूंचे भारताशी नाते दृढ झाले. स्टेडियमपासून ते अनेक पायाभूत सुविधांची आर्थिक गणित आयपीएलने सोपी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news