रशियाकडून बाखमुत शहर बेचिराख | पुढारी

रशियाकडून बाखमुत शहर बेचिराख

कीव्ह; वृत्तसंस्था : युक्रेनमधील दक्षिण प्रांतात युद्धाने उग्र रूप धारण केले आहे. रशियाकडे सातत्याने हवाई हल्ले केले जात असून युक्रेनला पिछाडीवर ढकलण्यासाठी रशियाकडून कोणत्याही प्रकारची कसर सोडली जात नसल्याचे चित्र आहे. याचदरम्यान रशियाने युक्रेनचे बाखमुत शहर रशियाने हल्ल्याने बेचिराख केली असून यामध्ये अनेक नागरिक मारले गेले असल्याची माहिती समोर आली आहे.

डोनेटस्ख, लुहान्सक प्रांतातील परिस्थिती खूपच गंभीर होत चाली आहे. बाखमुत, सोलेडार, मारयिंका आणि क्रेमिन्ना शहरातील एकही भाग असा राहिलेला नाही ज्याठिकाणी हल्ला केलेला नाही. रात्री उशिरा रशियाकडून इराणमध्ये तयार करण्यात आलेल्या ड्रोनद्वारे युक्रेनवर हल्ले केले.

Back to top button