

बॉलिवूडमध्ये सडेतोडपणे आपली मते व्यक्त करणारी ड्रामा क्वीन राखी सावंतचा (Rakhi Sawant) आज ४२ वाढदिवस. २५ नोव्हेंबर, १९७८ रोजी मुंबईत जन्मलेल्या राखी सावंतला (Rakhi Sawant) एंटरटेनमेंटचा डोस म्हटलं जातं. ती प्रत्येक मुद्द्यावर लोकांचे एंटरटेन करायला तयार असते. हेच कारण आहे की, तिचे मोठे फॅन फॉलोइंग आहे. तिचं प्रत्येक स्टेटमेंट सोशल मीडियावर व्हायरल होते. परंतु, बॉलीवूडमध्ये स्थान मिळवण्यासाठी राखीला अनेक संकटांचा सामना करावा लागला. पाहुया, राखीच्या वाढदिवसादिवशी जाणून घेवूया तिच्या आयुष्यातील काही रोमांचक गोष्टी.
राखी सावंतचं बालपण खूप गरिबीमध्ये गेलं. चित्रपट इंडस्ट्रीमध्ये येण्याआधी तिचं नाव नीरू होतं. राखीने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तिची आई हॉस्पिटलमध्ये आया म्हणून काम करायची. त्यामुळे उदररविर्नाह होणे कठीण होतं.
राखी सावंतला बालपणापासून डान्स करण्याची आवड होती. परंतु, तिच्या आईला तिने डान्स करणे अजिबात आवडत नव्हतं. एकेदिवशी रागाच्या भरात तिच्या आईने राखीचे केस कापले. कारण, त्यांच्या फॅमिलीत मुलींनी डान्स करणं, चांगले मानलं जात नसे. इतकचं नाही तर डान्स केला तर तिचे मामादेखील तिला खूप मारायचे.
राखी सावंत अभनेत्री होण्याआधी टीना आणि अनिल अंबानी यांच्या लग्नात वेट्रेस झाली होती. तिने लोकांना जेवण वाढले होते. या कामासाठी तिला केवळ ५० रुपये मिळाले होते.
राखी सांवतला इंडस्ट्रीची कॉन्ट्रोवर्सी क्वीनदेखील म्हटले जाते. मीका सिंहशी तिचा वाद खूप चर्चेत राहिला होता. मीका सिंहच्या वाढदिवसादिवशी मीकाने तिला किस केलं होतं. त्यानंतर राखीने मोठा गोंधळ घातला होता. इतकचं नव्हे तर यावर मीत ब्रदर्सनी मिळून एक गाणंदेखील बनवलं.
राखी अफेअरनुळे चर्चेत राहिली तरी टीव्हीवर 'राखी का स्वयंवर' खूप गाजला होता. २००९ मध्ये या शोमध्ये राखीने टोरांटोच्या एका स्पर्धकाला हार घालून साखरपुडा केला होता. शो संपल्यानंतर राखीचं नातंदेखील संपलं.