हनी ट्रॅपमध्ये बड्या व्यापाऱ्यांसह उद्योग व्यवसायिक आणि कॉलेज तरुणांना अडकवून त्यांच्याकडून कोट्यवधींची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीला आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गुरुवारी पहाटे ठिकाणी छापे टाकून संघटीत टाेळ्यांतील मोरक्यासह आठ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
त्यामध्ये दोन अल्पवयीन युवती आणि एका महिलेचा समावेश आहे. शाहूपुरी लक्ष्मीपुरी आणि शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये जयसिंगपूर मधील एका बडा व्यापारालाही संघटित टोळीने लाखो रुपयाला लुबाडले आहे. एका संघटित टोळीच्या प्रमुखाने ब्लॅकमेलसाठी स्वतःच्या पत्नीचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि एलसीबीचे प्रमुख प्रमोद जाधव यांच्या दणक्याने जिल्ह्यातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण लक्ष्मीपुरी शाहूपुरी शिरूर एमआयडीसी पोलीस ठाण्यासह जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा हनी ट्रॅप प्रकरणाच्या चौकशीत गुंतली आहे. महाराष्ट्र प्रथमच आणि हनी ट्रॅपचे प्रकरण कोल्हापूर जिल्ह्यात उघड केला येत आहे.