Amul hikes milk price : अमूलच्या दूध दरात ३ रुपयांपर्यंत वाढ, त्वरित दरवाढ लागू

Amul hikes milk price : अमूलच्या दूध दरात ३ रुपयांपर्यंत वाढ, त्वरित दरवाढ लागू
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरात डेअरी को-ऑपरेटिव्हने अमूलच्या दूध दरात प्रति लिटर ३ रुपयांपर्यंत वाढ (Amul hikes milk price) केली आहे. ही दरवाढ त्वरित लागू करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे अमूल गोल्ड दुधाचा दर प्रति लिटर ६६ रुपये, अमूल ताजा ५४ रुपये, अमूल गायीचे दूध प्रति लिटर ५६ रुपये आणि अमूल ए२ म्हशीच्या दुधाचा दर आता ७० रुपये असेल, असे गुजरात डेअरी को-ऑपरेटिव्हने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

याआधी अमूलने ऑक्टोबरमध्ये दूध दरात २ रुपयांची वाढ केली होती. दूध उत्पादनाचा खर्च वाढल्याने ही दरवाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जनावरांच्या चारा खर्चात सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्याचे लक्षात घेऊन आमच्या सदस्य संघटनांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरातही ८-९ टक्क्यांनी वाढ केली असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. (Amul hikes milk price)

डिसेंबरमध्ये मदर डेअरीने दिल्ली-एनसीआरमध्ये दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ केली होती. आता अमूलने दूध दरवाढ केल्याने सर्वसामान्यांना दूधासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news