Gold Silver Price Today | सोने तेजीत, चांदी स्वस्त, जाणून घ्या नवे दर

Gold Silver Price Today | सोने तेजीत, चांदी स्वस्त, जाणून घ्या नवे दर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : सणासुदीत सोन्याच्या दरातील तेजी कायम आहे. पण चांदी स्वस्त झाली आहे. सराफा बाजारात आज शुद्ध सोन्याचा म्हणजेच २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५९,८८५ रुपयांवर पोहोचला. याआधीच्या दिवशी ५९,८४० रुपयांवर होता. दरम्यान, चांदीच्या दरात आज ८९७ रुपयांची घसरण झाली. आज (दि.१९) चांदीचा दर प्रति किलो ७१,३०० रुपयांवर खुला झाला. याआधीच्या दिवशी (दि.१८) चांदीचा दर प्रति किलो ७२,१९७ रुपये होता. (Gold Silver Price Today)

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५९,८८५ रुपये, २३ कॅरेट ५९,६४५ रुपये, २२ कॅरेट ५४,८५५ रुपये, १८ कॅरेट ४४,९१४ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर ३५,०३३ रुपयांवर खुला झाला. तर चांदीचा दर प्रति किलो ७१,३०० रुपयांवर खुला झाला आहे.

सोन्यामध्ये गुंतवणूक वाढली

गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किमती वाढून तीन महिन्यांच्या उच्चांकाच्या जवळ पोहोचल्या आहेत. मध्य पूर्वतील संघर्षामुळे सुरक्षित मालमत्ता (सेफ हेवन) सोन्याची मागणी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे दर वाढू लागले आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, मंगळवार स्पॉट गोल्डचा दर प्रति औंस १,९४८.०६ प्रति औंसवर होता. आर्थिक आणि भू-राजकीय तणावाच्या काळात लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. याला सेफ हेवन मालमत्ता असे म्हटले जाते. (Gold Silver Price Today)

शुद्ध सोन्याची पारख कशी कराल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने म्हणून समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते. (Gold Rate Today)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news