Pixel smartphone : गुगल लवकरच भारतात पिक्सल फोनची निर्मिती करणार | पुढारी

Pixel smartphone : गुगल लवकरच भारतात पिक्सल फोनची निर्मिती करणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज (दि.१९) नवी दिल्ली येथे वार्षिक गुगल फॉर इंडिया २०२३ इव्हेंटमध्ये या फ्लॅगशिप इव्हेंटमध्ये AI- संचालित लाँच, भागीदारी आणि Google च्या मुख्य उत्पादनांमध्ये जसे की सर्च, GPay आणि Google क्लाउडमधील गुंतवणूकीची घोषणा केली.  त्याचबरोबर गुगलने मेक इन इंडिया उपक्रम अंतर्गत Pixel 8 मालिकेपासून सुरू होणारी पिक्सेल फोन मालिका देशात तयार करण्याची घोषणा केली आहे. (Pixel smartphone)

काय आहे गुगलचा मेक इन इंडिया उपक्रम

गुगलने, आयटी मंत्री अश्विनी विष्णव यांच्या उपस्थितीत, नवीनतम Pixel 8 मालिकेपासून सुरू होणारी पिक्सेल फोन मालिका देशात तयार करण्याची घोषणा केली. मेड-इन-इंडिया पिक्सेल २०२४ च्या सुरुवातीला खरेदीसाठी उपलब्ध होतील. Google उत्पादनासाठी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उत्पादकांसोबत भागीदारी करत आहे. या संदर्भात डिव्हाइस आणि सेवांसाठी कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष रिक ऑस्टरलोह म्हणतात की, पिक्सेल स्मार्टफोनसाठी भारत ही सर्वात महत्त्वाची बाजारपेठ आहे. गुगलन् पुढे म्हटलं आहे की,  भारत खरोखरच Android साठी एक विशेष स्थान आहे आणि भारताकडून मिळालेल्या शिकण्यामुळे गुगलला Android ला चांगले बनविण्यात मदत झाली आहे. पिक्सल-८ आणि पिक्सल वॉच २ 2 ला भारतात उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

दरम्यान गुगलच्या म्हणण्यानुसार, एप्रिल आणि जून २०२३ दरम्यान त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल भारतातील सुमारे २० लाख व्हिडिओ काढून टाकले आहेत. यापूर्वी गुगलने त्यांच्या धोरणांचे उल्लंघन केल्याबद्दल जानेवारी ते मार्च २०२३ दरम्यान भारतातील त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून १९ लाख व्हिडिओ हटवले होते. जागतिक स्तरावर व्हिडिओ-स्ट्रीमिंग दिग्गज यूट्यूबवरून याच कालावधीत नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ६४ लाखांहून अधिक व्हिडिओ काढून टाकले होते.

हेही वाचा 

Back to top button