पणजी : अफगाणिस्‍तानचे १६० विद्यार्थी शिक्षणासाठी गोव्यात

पणजी : अफगाणिस्‍तानचे १६० विद्यार्थी शिक्षणासाठी गोव्यात
Published on
Updated on

मडगाव ; रविना कुरतरकर :   अस्थिरतेच्या लाटेमुळे अफगाणिस्तान गेल्या तीन दिवसांपासून चर्चेत आहे. तालिबानने अफगाणिस्तानच्या काबूल शहराला ताब्यात घेतल्याने तेथील प्रशासकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा ठप्प झाली असून, शैक्षणिक व्यवस्थेवर ही पडसाद उमटल्याचे चित्र आहे. त्या अनुषंगाने समोर आलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्‍तानचे १६० विद्यार्थी शिक्षणासाठी गोव्यात असल्‍याची माहिती समाेर आली आहे.

गोव्यात विविध देशातील २११ विद्यार्थी

धार्मिक सालोख्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या गोव्यात विविध देशातील २११ विद्यार्थी पदवी आणि पदव्युत्‍तर शिक्षण घेत आहेत. त्यातील शिक्षणासाठी १६० अफगाणिस्तानचे विद्यार्थी गोव्यात असल्‍याची माहिती समोर.

मिळालेल्‍या माहितीनुसार, सरकारी महाविद्यालय केपे, सरकारी महाविद्यालय साखळी, मल्टिपरपज महाविद्यालय बोर्डा मडगाव, रोजरी महाविद्यालय नावेली, सेंट झेवियर महाविद्यालय, फादर आग्नेल महाविद्यालयात, डॉन बोस्को महाविद्यालय, ज्ञानप्रसारक महाविद्यालय, अशा एकूण १४ महाविद्यालयात आणि गोवा विद्यापीठात विविध देशातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

अफगाणिस्तानसह रशिया, श्रीलंका, बांगलादेश, आफ्रिका अशा ४० विविध देशांतील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. या २११ विद्यार्थ्यांपैकी ४० विद्यार्थी गोवा विद्यापीठात शिक्षण घेत आहेत.

इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशनशिप स्कॉलरशिप

इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशनशिप स्कॉलरशिप (ICCR scholarship) या अंतर्गत विद्यार्थ्यांना भारतात येऊन शिक्षण घेण्याची मुभा आहे.

सर्वेक्षणातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार तालिबानचा प्रभाव असलेल्या अफगाणिस्तानात विकसित शिक्षण व्यवस्था नसल्याने तेथील विद्यार्थी सरकारच्या सदर योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे.

अफगाणिस्तानातील विद्यार्थी आंतरराष्ट्रीय संबंधावर आधारित असलेल्या अभ्यासक्रमासाठी गोवा विद्यापीठाची निवड करत आहेत, अशी माहिती मिळत आहे.

गोवा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयात या मुलांनी प्रवेश घेतलेला आहे.

आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांच्या देशात उच्च सरकारी नोकऱ्याचा लाभ घेतला आहे.

अफगाणिस्तानातील १६० मुले अभ्यासक्रम पूर्णतेच्या पायरीवर

पाहणीतून समोर आलेल्या माहितीनुसार, एकूण अफगाणिस्तानातील विद्यार्थी धार्मिक सलोखा आणि शांततेसाठी प्रसिद्ध असलेल्या गोवा राज्याला अधिक पसंती देतात. अफगाणिस्तातील १६० मुले अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या पायरीवर आहेत.

यात ५ मुली व १५५ मुले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानातील १६० विद्यार्थ्यांपैकी, १२ विद्यार्थ्यांनी जुलै अभ्यासक्रम पूर्ण करताच आपल्या देशात परत गेले आहेत. त्यातील ६० विद्यार्थी परत जाण्याच्या प्रयत्नात आहेत.

'आयसीसीआर'चे रिजनल ऑफिसर, सुदर्शन शेट्टी, यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजने अंतर्गत भारत सरकार विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्याबरोबर त्यांच्या निवासाचा आणि अभ्यासक्रम शुल्काचा खर्च उठवत आहे.

या योजनेनुसार साठ टक्के खर्च भरत सरकार तर उर्वरीत चाळीस टक्के खर्च संबंधित देशाच्या सरकारकडून उचलला जात आहे.

जुलै २०२१ पर्यंत या विद्यार्थ्यांना त्यांचा खर्च पुरवण्यात आलेला आहे. या विद्यार्थ्यांविषयी भारत सरकार जो निर्णय घेणार त्याचेच पालन केले जाणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

हेही वाचलं का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news