

म्हापसा; पुढारी वृत्तसेवा : दत्तवाडी म्हापसा येथे झालेल्या स्वयं अपघातात मेहबूब खान पठाण (31, रा. कुचेली, म्हापसा ) हा दुचाकी चालक जागीच ठार झाला. गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेहबूब हे दुचाकीवरून दत्तवाडीमार्गे मापसा शहराकडे येत असताना श्री दत्त मंदिरासमोरील धोकादायक उतरणीवर त्यांचा वाहनावरील ताबा सुटला. यामुळे दुचाकी घसरून रस्त्यावर पडली. या अपघातात मेहबूब गंभीर जखमी झाले, अपघातात डोक्याला जबर मार बसल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. मेहबूब खान पठाण हे म्हापसा मार्केट यार्ड येथे फळे विक्रीचा व्यवसाय करायचे. म्हापसा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक सुनील पाटील व हवालदार केशव नाईक यांनी पंचनामा केला.
हेही वाचा :