गोव्यात दोघे बुडाले, एकाचा जीवन संपवण्याचा प्रयत्न, तर एकजण समुद्रात बेपत्ता | पुढारी

गोव्यात दोघे बुडाले, एकाचा जीवन संपवण्याचा प्रयत्न, तर एकजण समुद्रात बेपत्ता

पणजी; पुढारी वृत्तसेवा : मांडवी पुलावरून एकाने नदीत उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. रणजित केणी (45, पणजी) असे त्याचे नाव आहे. त्याला सागरी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यातून बाहेर काढून गोवा मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये पाठविले. तर, कोलवा समुद्रकिनार्‍यावर मित्रांचा एक गट पोहण्यासाठी गेला होता. त्यातील एकजण समुद्रात बुडाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या त्याचा शोध सुरू आहे.

हेही वाचा :

Back to top button