

पणजी: पुढारी वृत्तसेवा : गोव्यातील किनारी भागात आयोजित केल्या जाणाऱ्या भारतातील युवांचे आकर्षक असलेल्या सनबर्न या संगीत नृत्य महोत्सवाला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा संगीत महोत्सव होतो. तीन दिवसांच्या या संगीत महोत्सवात हजारो युवा सहभागी होतात. या संगीत महोत्सवात अंमली पदार्थांचा वापर होत असल्याचा दावा करून हा महोत्सव बंद करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. ही याचिका आज (दि.३) फेटाळण्यात आली. (Sunburn Festival)
हेही वाचा