मडगाव, पुढारी वृत्तसेवा : एकीकडे राज्य सरकार राज्यात पर्यटन व्यवसाय वाढवण्यासाठी विविध योजना राबवत आहे. तर दुसरीकडे दक्षिण गोव्यातील एका मंत्र्यांचा पुतण्याच्या पर्यटकांशी रस्त्यावर फ्री स्टाईल स्ट्रीट फाईटच्या एका व्हिडिओने खळबळ उडाली आहे. या माजी मंत्र्याचे नाव आवेर्तान फुर्तादो असे आहे.
ही घटना उत्तर गोव्यातील पर्वरी येथील एका दारूच्या दुकानाबाहेर घडली आहे. मंत्र्याचा पुतण्या आपल्या मैत्रिणीला तिच्या घरी सोडण्यासाठी गेला होता. मात्र पर्वरी येथे दुकानांत खरेदी करण्यासाठी ती थांबली असता काऊंटवर गुगल पे करण्यावरून वाद निर्माण झाला. त्याचे पर्यावसन मारामारीत झाले. स्थानिक युवकांनी आणि केरळ स्थित पर्यटकांनी मंत्र्यांच्या पुतण्याला जबर मारहाण केली. दुकानांचे शटर त्याच्या डोकीवर आपटल्यामुळे त्याच्या डोकीतून बराच रक्तस्त्राव झाला आहे. शिवाय त्याच्या मैत्रिणीशीही गैरवर्तवणूक करण्यात आली आहे. पर्वरी पोलीस स्थानकात याविषयी नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडीओत आपल्या पुतण्याचे नाव वापरल्याबद्धल माजी मंत्री आवेर्तान फुर्तादो यांनी सायबर विभागात पोलिस तक्रार दाखल केली आहे.
.हेही वाचा