Goa News : भाजपचे सदानंद शेट तानावडे राज्यसभेवर बिनविरोध | पुढारी

Goa News : भाजपचे सदानंद शेट तानावडे राज्यसभेवर बिनविरोध

पणजी : पुढारी वृतसेवा – भारतीय जनता पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची आज राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. गोव्यातील एकमेव राज्यसभेच्या जागेसाठी तानावडे यांनी अर्ज भरला होता. (Goa News)  अन्य कुणी अर्ज न भरल्यामुळे आज दिनांक १८ रोजी अंतिम निवडीच्या दिवशी गोवा विधानसभेच्या सचिव नम्रता उलमन यांनी तानवडे यांना राज्यसभेवर निवड झाल्याचे पत्र दिले. (Goa News )

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच इतर मंत्री आणि आमदार उपस्थित होते. सर्वांनी तानावडे यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले. ४० आमदारांच्या गोवा विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील गोवा सरकारला ३३ आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामध्ये २८ आमदार भाजपाचे असून तीन अपक्षांसह मगो पक्षाच्या दोन आमदारांचा सरकारला पाठिंबा आहे.

Back to top button