PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा | पुढारी

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा

पुढारी ऑनलाईन : मध्य प्रदेशातील भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.२७ जून) भोपाळ (राणी कमलापती) – इंदूर वंदे भारत एक्सप्रेससह देशातील इतर ५ वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील इतर ४ वंदे भारत एक्सप्रेसला भोपाळमधूनच हिरवा झेंडा दाखवून व्हिडीओ कॉन्फरन्ससिंगद्वारे एक्सप्रेसचे उद्घाटन केले.

यात भोपाळमधील राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून भोपाळ-इंदूर वंदे भारत एक्सप्रेस, भोपाळ-जबलपूर वंदे भारत एक्सप्रेस, रांची-पाटणा वंदे भारत एक्सप्रेस, धारवाड-बंगळूर वंदे भारत एक्सप्रेस आणि गोवा (मडगाव)-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहे. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह-चौहान, रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्धाटनानंतर पीएम मोदी भोपाळमधील मोतीलाल नेहरू स्टेडियममध्ये मेरा बूथ, सबसे मजबूत या अभियांनाच्या माध्यमातून देशभरातील बुथ कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

ओडिशामधील भीषण रेल्वे अपघातानंतर नियोजित वंदे भारतच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. त्यानंतर पीएम मोदी यांच्या हस्ते आज (दि.२७ जून) रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान पीएम मोदी यांच्या हस्ते मध्य प्रदेशातील भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून भोपाळ (राणी कमलापती) – इंदूर आणि  भोपाळ-जबलपूर या दोन वंदे भारत एक्सप्रेसला येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

हेही वाचा:

Back to top button