

पुढारी ऑनलाईन डेस्क : आजही कोरोना हा शब्द उच्चारला तरी सर्वसामान्यांचे टेन्शन वाढते. तीन वर्षांपूर्वी संपूर्ण जगाला वेठीस धरलेल्या या विषाणूचे भय आजही कायम आहे. आता संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीतून सावरले आहे. मात्र एका नवीन संशोधनात काही युरोपीय देशांमध्ये हा नवीन व्हेरियंट (उत्परिवर्तन) आढळला आहे. ( COVID variant ) सर्व देशांनी कोरोनाबाबत सतर्क राहण्याची गरज असल्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. जाणून घेवूया या नवीन संशोधनाबाबत…
मागील काही महिन्यात कोरोनाच्या नवीन व्हेरियंट आढळत होते. आता सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) ने कोरोनाचे नवीन व्हेरियंट EU.1.1 आल्याची नोंद केली आहे.अलीकडे, कोरोना संसर्गाची पुष्टी झालेल्यांमध्ये हा प्रकार मुख्य कारण असल्याचे आढळून आले आहे. सध्या या बाबत संशोधन सुरू आहे. अमेरिकेतील सर्व COVID-19 प्रकरणांपैकी सुमारे १.७ टक्के प्रकरणे या नवीन व्हेरिंयटमुळे असल्याचेही निदर्शनास आले आहे.
आतापर्यंतच्या प्राथमिक संशोधनात असे आढळून आले आहे की, कोरोना नवीन व्हेरियंट EU.1.1 हे Omicron च्या XBB.1.5 उप-प्रकारचा वंशज आहे. आरोग्य तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे की, कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे संक्रमित लोकांमध्ये नवीन लक्षणे निर्माण करतील. यासाठी नवीन लसींची आवश्यकता असेल हे सांगणे आताच खूप घाईचे ठरेल. बहुतेक लोकांचे लसीकरण झाले आहे, ज्यामुळे शरीरात मजबूत प्रतिकारशक्ती आहे, या प्रकाराचा अशा लोकांवर कसा परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे आहे, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटवर अभ्यास करणार्या संशोधकांच्या टीमने स्पष्ट केले आहे की, SARS-CoV-2 विषाणू जो COVID-19 रोगास कारणीभूत ठरतो तो सतत बदलत असतो. त्यामुळे नेहमीच नवीन व्हेरियंट हा भीती पसरविण्याचे वर काम करतो. काहींचे स्वरूप अधिक संसर्गजन्य किंवा गंभीर रोगांचे कारण ठरु शकते.
कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरियंटमध्ये वारंवार होणारे उत्परिवर्तन लक्षात घेता, आरोग्य तज्ञांनी अलीकडेच नवीन प्रकारांना लक्ष्य करणार्या लसींच्या गरजेवर भर दिला आहे. आत्तापर्यंत उपलब्ध असलेल्या बहुतांश लसी कोरोनाच्या मूळ प्रकाराला लक्ष्य करत असल्याने गेल्या तीन वर्षांत कोरोना विषाणूच्या मूळ रुपात बरेच बदल झाल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. आता नवीन व्हेरियंटला लक्ष्य करण्यासाठी शास्त्रज्ञांनी विशेष नवीन लसी देखील विकसित केल्या आहेत. Moderna ने अलीकडेच जाहीर केले की, त्यांनी नवीन सुधारित लस तयार केली आहे, ज्याची शिफारस आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी 'एफडीए' कडे पाठवण्यात आली आहे. दरम्यान, कोरोना व्हेरियंटचा नवीन प्रकारांचा धोका लक्षात घेता, भारताने नुकतीच विशेषत: ओमिक्रॉन प्रकारांना लक्ष्य करणारी बूस्टर लस देखील लॉन्च केली आहे.
हेही वाचा :