पणजी : पुढारी वृत्तसेवा: सायबर क्राईम विभागाने शुक्रवारी जुनेगोवा येथील बनावट कॉल सेंटरचा पदार्फाश केला. याप्रकरणी 16 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून 14 संगणक व 8 मोबाईल जप्त केल्याची माहिती सायबर सेलचे निरीक्षक राहुल परब यांनी दिली.
या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मेहसाना (गुजरात) येथील महमद रमीज घांची उर्फ रॉय फनार्डिंस (वय 32) याला अटक करण्यात आली आहे. सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, छाप्यादरम्यान अवैध कॉल सेंटरमधून 14 संगणक उपकरणे व आठ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या गुन्ह्यात आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली असून, रॉय हा भाड्याच्या बंगल्यात बनावट कॉल सेंटर चालविण्यामागील प्रमुख सूत्रधार आहे.
या कॉल सेंटरमध्ये रॉय व त्याचे कर्मचारी अॅमेझॉन ऑपरेटर्सची तोतयागिरी करण्यासाठी कॉल सेंटरचा वापर करत होते. त्यांच्याकडून अमेरिकननागरीकांची फसवणूक केली जात होती. खबर्याकडून माहिती मिळाल्यानंतर सायबर सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवेंदू भूषण, पोलिस निरीक्षक राहुल परब, पोलीस उपिनरीक्षक देवेंद्र पिंग,सर्वेश सावंत, शीतल नाईक, हवालदार युगेश खांपारकर, शिपाई सागर गावस, मयूर राणे, एस. शेट्ये, विनय आमोणकर, विशाल, संदेश नाईक, निलेश नाईक, व नाझीर सय्यद यांच्या या पथकामध्ये समावेश होता. शुक्रवारी मध्यरात्री या पथकाने ही कारवाई केली.
फसवणूक करणार्या या कॉलसेंटरमध्ये काम करणार्या आठ मुलींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सर्वांना प्रथम वर्ग न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली आहे.
हेही वाचलंत का?