गोव्यात विरोधी पक्षनेत्यांवरच बेकायदेशीर वृक्षतोड केल्याने गुन्हा दाखल | पुढारी

गोव्यात विरोधी पक्षनेत्यांवरच बेकायदेशीर वृक्षतोड केल्याने गुन्हा दाखल

पणजी, पुढारी वृत्तसेवा : शिवोली मतदारसंघातील पर्रा येथे बेकायदेशीरपणे झाडे तोडणे, जमीन सपाटीकरण करणे, आणि त्यामध्ये मातीचा भराव टाकला आहे. या बेकायदेशीर गोष्टी केल्याबद्दल काँग्रेसचे आमदार तथा विरोधी पक्षनेते मायकल लोबो व त्यांच्या पत्नी आमदार डिलायला लोबो यांच्या विरुद्ध म्हापसा पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

नगर नियोजन खात्याचे मंत्री विश्‍वजित राणे म्‍हणाले, पर्रा येथे कायद्याचा भंग करून मायकल लोबो व डिलायला लोबो यांनी मातीचा भराव टाकला आहे. त्याचबरोबर झाडांची कत्तल केलेली आहे. अश्या बेकायदेशीर कामांना सरकार स्थान देणार नाही. नियम भंग केल्याबद्दल त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे, असे विश्‍वजित राणे यांनी सांगितले.

दरम्यान, विरोधी पक्ष नेते मायकल लोबो यांनी पर्रा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण कोणतीही बेकायदेशीर गोष्ट केली नसल्याचा दावा केला आहे.

हेही वाचा

Back to top button