बेळगाव : ‘उदो गं आई, उदो’ च्या घोषात यात्रा सुरू; २ लाख भाविकांकडून रेणुकादेवीचे दर्शन; महाराष्ट्रातील भक्तांची पाठ

बेळगाव : ‘उदो गं आई, उदो’ च्या घोषात यात्रा सुरू; २ लाख भाविकांकडून रेणुकादेवीचे दर्शन; महाराष्ट्रातील भक्तांची पाठ

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

'उदो ग आई, उदो उदो'च्या जयघोषात दोन वर्षांच्या खंडानंतर बुधवारी श्रीक्षेत्र सौंदत्ती यल्लम्मा येथे माघी पौर्णिमेची यात्रा उत्साहात पार पाडली.

यात्रेचा मुख्य दिवस होता. महाराष्ट्रातील बहुतांशी भक्त मंडळी येऊ न शकल्याने यंदा जवळपास दोन लाख भक्तांनी देवीचे दर्शन घेतले. यावर्षी विशेष व्यवस्था करण्यात आली नसल्याने भक्तांची गैरसोयही झाली.

कोरोना पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून पूर्ण क्षमतेने भाविकांना सौंदत्ती यल्लम्मा येथे येण्यास बंदी घालण्यात आली होती. यंदा कोरोना स्थिती नियंत्रणात आल्याने प्रशासनाकडून मंदिर खुले करण्यात आले होते. यात्रेसाठी बंदी होती मात्र सर्व भक्तांसाठी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. माघी पौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यात्रेसाठी महाराष्ट्रातून येणार्‍या भक्तांची संख्या अधिक असते. मात्र, महाराष्ट्रातील भक्तांमध्ये मंदिर बंद असल्याची माहिती गेल्यामुळे व महाराष्ट्रात बस कर्मचार्‍याचा संप असल्यामुळे जवळपास 80 टक्के भक्त येऊ शकले नाहीत. उत्तर कर्नाटकमधील भक्तांची संख्या अधिक होती. खासगी वाहने आणि बैलगाड्यातून भक्त मंडळी आले होते.

यात्रेच्या निमित्ताने डोंगर परिसर भाविकांनी फुलला होता. या परिसरात दुकानेही सजली होती. कुंकू, भंडारा, कापूर, फळे, मिठाई यासह पूजेच्या साहित्याची दुकाने सजली होती. व्यवस्थापन समितीकडून पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहाची काही ठिकाणी निवासची व्यवस्था करण्यात आली होती मात्र ही व्यवस्था पुरेशी नव्हती. यात्रेचा आज मुख्य दिवस असलातरी ही यात्रा आगामी दीड महिना चालणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news