#GoaElection2022 : दक्षिण गोव्यातील प्रियोळ मतदारसंघात सर्वांधिक मतदान | पुढारी

#GoaElection2022 : दक्षिण गोव्यातील प्रियोळ मतदारसंघात सर्वांधिक मतदान

मडगाव,  पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी सोमवारी दक्षिण गोव्यातील प्रियोळ मतदारसंघ अव्वल ठरला आहे. या मतदान केंद्रावर सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत मतदान केंद्रावर मतदारांच्या मोठ्या रांगा होत्या. ९ वाजेपर्यंत प्रियोळ मतदारसंघात सर्वात जास्त १४.२६ टक्के एवढे मतदान नोंद झाले असून संपूर्ण दक्षिण गोव्यात ११.६९ टक्के मतदान झाले.

प्रियोळ १४.२६ टक्के, फोंडा ११.५३ टक्के,, शिरोडा १०.५३ टक्के, माशेल ११.१४ टक्के, मुरगाव १२.६३ टक्के, वास्को १०.०४ टक्के, दाबोळी १२.०२ टक्के, कुठ्ठाळी १२.३४ टक्के, नुवे ११.०१ टक्के, कुडतरी ११.४९ टक्के, फातोर्डा १२.८२ टक्के, मडगाव १०.७८ टक्के, बाणावली १०.२६ टक्के, नावेली १०.९३ टक्के, कुंकळी १२.२३ टक्के, वेळ्ळी ११.७१ टक्के, केपे ११.५१ टक्के, कुडचडे १३.०१ टक्के, सावर्डे ९.५३ टक्के, सांगे १२.८१ टक्के, कोणकोण १२.७५ टक्के एवढे मतदान सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत झाले.

हे ही वाचलं का 

Back to top button