Goa Polling Booth : गाेव्‍यात मतदान केंद्रे 'नटली', मतदारांसाठी 'सजली'... | पुढारी

Goa Polling Booth : गाेव्‍यात मतदान केंद्रे 'नटली', मतदारांसाठी 'सजली'...

पुढारी ऑनलाईन डेस्क : 

लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये निवडणूक ही एक महत्त्‍वपूर्ण प्रक्रिया. यातील मतदानाचा दिवस हा मतदार राजाचाच. लाेकशाहीत मतदार हाच राजा, हे सांगणार हा दिवस. मतदार जेवढा निर्भयपणे आपला हक्‍क बजावेल तेवढी लाेकशाहीचा पाया अधिक भक्‍कम हाेताे. त्‍यामुळे मतदार राजाला मतदानाचा हक्‍क बजावताना एक स्‍मरणीय अनुभव यावा, यासाठी गाेवा येथील मतदान केंद्रे सजली आहे.  (Gov election 2022)

उत्तराखंड आणि गोवा या राज्यातील सर्व जागांवर आज  (ता. 14) मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर गोवा राज्याच्या मतदान केंद्रावर हटके, लोकशाही बळकटीकरणास प्रोत्साहन देणारे, मतदाराला मतदान करण्यास आवाहन करण्‍यासाठी मतदान केंद्रे सजवली आहेत.  (Goa Polling Booth)

Goa Voting Booth – हटके आणि पर्यावरणपूरक

आज मतदान दिवशी व्हॅलेंटलाईन डेही आहे. या धर्तीवर गोवा राज्यात लव्हशेप मध्ये व्‍होटिंग-डेटिंग(Voting-Dating) अक्षरात लिहून हटके पध्दतीने मतदारांना आवाहन केले आहे. तर एक मतदान केंद्रावर फुलांमध्ये सजवला आहे.  पर्यावरण पूरक अशी मतदान केंद्रे सजवत मतदार राजा स्वागत केले आहे.

Voting-Dating www.pudhari.news
लव्हशेप मध्ये वोटींग-डेटींग(Voting-Dating)

मतदारांना आवाहन 

पर्यावरण पूरक आणि हटके पध्दतीने मतदान केंद्र सजवल्याने सर्वत्र हा विषय कौतुकास्पद ठरला आहे. सध्या गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी. श्री. कुणाल हे आहेत. यांनीही मतदारांना मतदान करण्यास आवाहन केले आहे.

द‍ृष्टिक्षेपात गोवा

मतदारसंघ : 40
उमेदवार : 301
मतदार : 11 लाखांहून अधिक

हेही वाचलतं का ?

Back to top button