गोवा : त्या बिबट्याचा संशयास्पद मृत्यू | पुढारी

गोवा : त्या बिबट्याचा संशयास्पद मृत्यू

फोंडा (गोवा), पुढारी वृत्तसेवा : गोव्यातील बागवाडा-वेलिंग या भागात बिबटयाचा वावर वाढला आहे. या परिसरातील रामदास नाईक यांच्या घराभोवती एक बिबट्या दिसून आला. यामूळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झााले होते. नाईक यांनी याबाबत तत्‍काळ वनविभाग तसेच पोलिसांना माहिती दिली.

बिबट्याची माहिती मिळाताच वनविभागाने त्या ठिकाणी धाव घेतली. त्‍यानंतर वनविभागाकडून हा परिसर काही वेळेसाठी बंद करण्यात आला होता. पोलिस आणि वनविभाच्या कर्मचा-यांना हा बिबटया पडलेल्‍या अवस्‍थेत दिसून आला. यानंतर कर्मचा-यांनी बिबटयाला पकडले. परंतु त्‍यावेळी त्‍याचा मृत्यू झाला होता. पोलिसांना त्याच्या मानेवर काही जखमा दिसून आल्‍या आहेत. त्‍यामूळे त्‍याचा मृत्यू हा संशयास्पद असावा असे पोलिसांनी सांगितले. तसेच त्‍याबाबत पोलिस तपास करत आहेत.

हे ही वाचलं का

Back to top button