राजुरी येथे बालकावर हल्‍ला करणारा बिबट्या जेरबंद | पुढारी

राजुरी येथे बालकावर हल्‍ला करणारा बिबट्या जेरबंद

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा

राजुरी ( ता. जुन्नर ) येथे तीन वर्षाच्या बालकावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्‍यात आले. मागील काही दिवसापासून या भागात बिबट्याने दहशत माजवली होती. शुक्रवारी रात्री नऊ वाजता बिबट्या जेरबंद  करण्यात वनविभागाला यश आले आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्‍त होत आहे.

राजुरी येथील गव्हाळी मळ्यामधील एका लहान तीन वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना रविवारी (दि. २९ ऑगस्ट) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली होती. अंगणात खेळत असताना, बिबटयाने अचानकपणे या बालकावर हल्ला करून त्या बालकास घराजवळच असलेल्या ऊसाच्या शेतात फरफटत नेले. जखमी बालकाला पुणे या ठिकाणी पुढील उपचारासाठी हलवले होते.

या बिबट्याने शेळ्या, मेढ्या ठार केल्या होत्या. स्थानिक नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु होते. अखेर सुदाम खंडू हाडवळे यांच्या शेतात शुक्रवारी रात्री एका बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.

Back to top button